आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्याच जाळ्यात अडकली टीम इंडिया:11 वर्षांपूर्वी माँटी पानेसरने केले होते असे हाल, यावेळी नॅथनने दाखवले अस्मान

स्पोर्ट्स डेस्क20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात भारताला 9 विकेट्सनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तिसर्‍या दिवशी उपाहारापूर्वी सामना संपला. यावरून टीम इंडियाच्या वाईट पराभवाचा अंदाज लावता येतो. या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याची भारताची प्रतीक्षाही थोडी वाढली आहे.

टर्निंग ट्रॅक हे भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. भारताने पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यासाठी टर्निंग ट्रॅक बनवला होता, जेणेकरून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्यांच्या फिरकीच्या ट्रॅकमध्ये अडकवता येईल. पण यावेळी ही सट्टेबाजी भारतासाठी उलटली आणि ऑस्ट्रेलियन फिरकीपटू खासकरून नॅथन लियॉनने टीम इंडियाची 'लंका' केली.

11 वर्षांपूर्वी माँटी पानेसरने उडवली होती दाणादाण

भारतीय संघाच्या या लाजिरवाण्या पराभवाने 2012 मधील वानखेडे कसोटी सामन्याची आठवण करून दिली. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारताला 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी माँटी पानेसरच्या भेदक गोलंदाजीमुळे संपूर्ण भारतीय संघ 142 धावांवर गडगडला, ज्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 57 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. नंतर इंग्लंड संघाने एकही विकेट न गमावता हे सोपे लक्ष्य गाठले.

फिरकी गोलंदाज माँटी पानेसरने 2012च्या कसोटी सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या होत्या.
फिरकी गोलंदाज माँटी पानेसरने 2012च्या कसोटी सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या होत्या.

टर्निंग ट्रॅकवर पानेसरने आणले होते वादळ

त्या सामन्यासाठी तत्कालीन भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वानखेडेमध्ये टर्निंग पिच बनवली होती, पण इंग्लंडने टीम इंडियाच्या आशा धुळीस मिळवल्या. दुसऱ्या डावात गवताळ खेळपट्टीवर भारतीय फलंदाज पूर्णपणे गडबडले आणि एकूण केवळ 142 धावाच जोडू शकले, ज्यामध्ये गौतम गंभीरने एकट्याने 65 धावा केल्या होत्या. फिरकी गोलंदाज माँटी पानेसरने त्या सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पुजाराच्या शानदार 135 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 413 धावा केल्या आणि 86 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून केविन पीटरसनने 186 आणि अॅलिस्टर कुकने 122 धावांचे योगदान दिले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर कसोटीचे हाल

भारत पहिला डाव - 109 धावा

ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 197 धावा

भारताचा दुसरा डाव – 163 धावा

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव - 78/1*

2012 वानखेडे कसोटीचे हाल

भारत पहिला डाव - 327 धावा

इंग्लंड पहिला डाव – 413 धावा

भारताचा दुसरा डाव – 142 धावा

इंग्लंड दुसरा डाव - 58/0 धावा

तेव्हा माँटी पानेसर, आता नॅथन लायनने केली धूळधाण

यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटीत गौतम गंभीरप्रमाणे चेतेश्वर पुजारानेही संयम दाखवत दुसऱ्या डावात 59 धावा केल्या, तर बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. नॅथन लायनने दुसऱ्या डावात 8 फलंदाजांना माघारी धाडले आणि सामन्यात एकूण 11 विकेट्स घेऊन तो सामनावीर ठरला.

संबंधित वृत्त

इंदूर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव:ऑस्ट्रेलियाने 76 मिनिटांत 76 धावांचे लक्ष्य गाठले, 9 गडी राखून विजय

ट्रेव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या संयमी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरोधातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना 9 गड्यांनी आपल्या नावे केला आहे. या विजयामुळे कांगारूंच्या संघाने मालिकेत 2 विरुद्ध 1 असे पुनरागमन केले आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल. येथे वाचा सविस्तर वृत्त

महिला प्रीमियर लीगची शुभंकर वाघीण, नाव- शक्ती::BCCI सचिव जय शाह यांनी केला लॉन्च, 4 मार्चला WPL चा पहिला सामना

महिला इंडियन प्रीमियर लीगचा शुभंकर वाघीण आहे आणि तिला शक्ती असे नाव देण्यात आले आहे. BCCI चे सचिव जय शाह यांनी गुरुवारी त्याचे प्रकाशन केले. त्याचा व्हिडिओ BCCI ने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या WPL च्या जोरदार उद्घाटनासाठीही तयारी करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहे. लाईव्ह इव्हेंटमध्ये, अभिनेत्री बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट गाण्यांवर नृत्य करणार आहे. महिला प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना 4 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

बातम्या आणखी आहेत...