आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेच्या पराभवानंतर भारताने WTC म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विजेतेपदाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. WTC च्या सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. यानंतर टीम इंडियाचा मार्ग मोकळा झाला. डब्ल्यूटीसी टूर्नामेंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताने दुसऱ्या क्रमांकावरील स्थान पक्के केले आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. 12 जून हा राखीव दिवस असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा हा दुसरा हंगाम आहे.
भारताला सलग दुसऱ्यांदा WTC फायनल खेळण्याची संधी आहे. याआधी 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना झाला होता. त्यात किवी संघाने साउथॅम्प्टनमध्ये भारताचा 8 विकेट राखून पराभव केला.
सर्वात पहिले WTC चा पॉईंट्स टेबल पाहा...
आता समजून घ्या, श्रीलंकेच्या पराभवाचा भारताला कसा फायदा झाला
श्रीलंकेच्या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव झाला. यामुळे त्याला गुणतालिकेत 48.48% गुण मिळाले. आता श्रीलंकेच्या संघाने मालिका 1-0 ने जिंकली तरी त्याचे भारताएवढे गुण होणार नाहीत.
दुसरीकडे, आता जर भारतीय संघ चौथा कसोटी सामना हरलाही तर त्याचे 56.94% गुण शिल्लक राहतील, जे श्रीलंकेपेक्षा जास्त आहेत.
WTC स्पर्धेत भारत : आतापर्यंत 17 सामने खेळले, 10 जिंकले
विल्यमसनने शतक झळकावले
पाचव्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 257 धावांची गरज होती. न्यूझीलंडने 28/1 च्या पुढे खेळ सुरू केला. केन विल्यमसनने शतक झळकावून संघाचा विजय निश्चित केला. विल्यमसनने 194 चेंडूत 121 धावांची नाबाद शतकी खेळी केली. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 1 षटकारही लगावला. विल्यमसनशिवाय डॅरिल मिशेलने 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय प्रभात जयसूर्याने 2, कसून रजिथा आणि लाहिरू कुमाराने 1-1 बळी घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.