आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी कसाेटी/ पहिला दिवस:विराट काेहलीचे अर्धशतक; वेगवान 23 हजार धावा पूर्ण

आेव्हल14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट काेहली (५०) व शार्दूल ठाकूरने (५७) वेळीच डाव सावरणारी खेळी करत गुरुवारी इंग्लंडविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात अर्धशतक साजरे केले. भारतीय संघाला ६१.३ षटकांत पहिल्या डावात १९१ धावा काढता आल्या. शार्दूल ठाकूरने (५७) करिअरमधील दुसरे कसाेटी अर्धशतक साजरे केले. त्याने ३१ चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावले. इंग्लंडकडून वाेक्सने चार व राॅबिन्सनने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ५३ धावा काढल्या. आता १३८ धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडचा मलान (२६) आणि क्रेग आेव्हर्टन (१) मैदानावर कायम आहेत. सलामीवीर राॅरी बर्न्स (५) आणि हसीब हमीद (०) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार ज्याे रुटने २१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला उमेश यादवने ित्रफळाचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भारताकडून उमेश यादवने एक आणि जसप्रीत बुमराहने दाेन विकेट घेतल्या. टीम इंडियापाठाेपाठ यजमान इंग्लंड संघाचीही पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. टीमने ६ धावांसाठी दाेन विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार ज्याे रुट आणि मलानने संंघाची पडझड थांबवली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यांचा माेठ्या भागीदारीचा प्रयत्न अपयशी ठरला.

नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंड संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रुटचा हा निर्णय क्रिस वाेक्स आणि राॅबिन्सनने याेग्य ठरवला.

यादरम्यान काेहलीचे अर्धशतक लक्षवेधी ठरले. याच अर्धशतकादरम्यान काेहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम गाजवला. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे जगातील एकमेव फलंदाज ठरला. त्याने ४९० डावांत हा पल्ला गाठला. त्याने सचिनला (५२२) विक्रमात मागे टाकले.

बातम्या आणखी आहेत...