आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनडे मालिका:चार वर्षांनंतर इंग्लंड टीम पुण्यात खेळणार; विराटचे वर्चस्व असलेल्या मैदानावर टीम इंडियाचे यश फिफ्टी-फिफ्टी

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत आणि इंग्लंड वनडे मालिका आजपासून पुण्यामध्ये रंगणार

भारत आणि इंग्लंड संघ तब्बल चार वर्षांनंतर वनडे सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील मैदानावर समाेरासमाेर असणार आहेत. आज मंगळवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला पुण्यातील गंहुजे स्टेडियममध्ये सुरुवात हाेणार आहे. कर्णधार विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीने या मैदानावर मालिका गाजवलेली आहे. मात्र, कोहलीचे वर्चस्व असलेल्या याच मैदानावर यजमान भारतीय संघाचे यश हे संमिश्र ठरलेेले आहे. मात्र, यात आघाडी घेण्याची टीम इंडियाला संधी आहे. कारण, चार वर्षांपूर्वी भारतीय संघाने याच मैदानावर पाहुण्या इंग्लंडला वनडे सामन्यात धूळ चारली हाेती. त्यामुळे टीम इंडिया विजयाचा हाच कित्ता पुन्हा गिरवत मालिका आपल्या नावे करण्याच्या इराद्याने या मैदानावर उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड संघ आता एमसीएच्या पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील सलामी सामना मंगळवारी रंगणार आहे.

सलग कसोटी व टी-२० मालिका विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता वनडे सिरीजही खिशात घालण्यासाठी उत्सुक आहे. यासाठीचे भारतीय संघाचे या मैदानावरील पारडे जड मानले जाते. कारण, टीम इंडियाने २०१७ मध्ये याच मैदानावर इंग्लंडवर मात केली हाेती.

भारत चारपैकी दाेन वनडेत विजयी
भारतीय संघाने आतापर्यंत २०१३ ते २०१८ दरम्यान पाच वर्षांत एकूण चार वनडे सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाच्या विजयाचे रेकाॅर्ड बराेबरीतले आहे. कारण, टीमने चार पैकी दाेन वनडेत विजयी पताका फडकावली. यामध्ये २०१७ मधील इंग्लंडविरुद्ध (तीन गड्यांनी) आणि न्यूझीलंडविरुद्ध (६ गड्यांनी) विजयाचा समावेश आहे. मात्र, आॅस्ट्रेलिया (२०१३) आणि विंडीजविरुद्ध (२०१८) सामन्यात भारताचा पराभव झाला हाेता.

नंबर वनची भारताला संधी
यजमान भारतीय संघाला आता वनडे मालिका विजयाने आयसीसीच्या क्रमवारीत नंबर वनचे स्थान गाठण्याची संधी आहे. सलगच्या मालिका विजयाने आता भारताचा हा दावाही मजबूत मानला जात आहे. इंग्लंड संघ १२३ गुणांसह अव्वल व भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

माॅर्गनच्या नेतृत्वात प्रगती
ज्याे रुटच्या नेतृत्वात इंग्लंडने या मैदानावर भारताविरुद्धच्या वनडे सामना गमावला हाेता. आता इयान माॅर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघ या मैदानावर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे कामगिरीचा दर्जा उंचावत भारताविरुद्ध रेकॉर्डमध्ये विजयाची नाेंेद करण्याची संधी माॅर्गनला आहे.

काेहलीची विराट खेळी; चार सामन्यांत दाेन शतकांसह ३१९ धावा
टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने झंझावाती फलंदाजीने हे मैदान गाजवलेले आहे. त्याच्या नावे या मैदानावर दाेन शतकांसह एका अर्धशतकाची नाेंद आहे. त्याने चार सामन्यांत ३१९ धावांची खेळी केलेली आहे. यामध्ये १२२ धावांची सर्वाेच्च खेळीचा समावेश आहे. त्यापाठाेपाठ त्याने १०७ धावांची दुसरी सर्वाेत्तम खेळी या मैदानावर केली हाेती.

जेसन राॅयचे अर्धशतक; माॅर्गन, स्टाेक्स, रशिद बटलर वर्षानंतर याच मैदानावर
२०१७ मधील इंग्लंड टीमच्या पुण्यातील मैदानावरील पराभवाचे साक्षीदार सदस्य खेळाडू म्हणून जेसन राॅय, इयान माॅर्गन, जाेस बटलर, बेन स्टाेक्स आहेत. त्यामुळे आता पाचही जणांना पुन्हा एकदा चार वर्षांनंतर याच मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आहे. या मैदानावर जेसन राॅयच्या नावे सर्वाेत्तम ७३ धावांची खेळी नाेंद आहे. तसेच बेन स्टाेक्सने ६२ धावांची खेळी केलेली आहे.
73 सर्वाेत्तम सातवा स्काेअर जेसनचा भारतविरुद्ध वनडेत या मैदानावर.

बातम्या आणखी आहेत...