आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसाेटी/ चाैथा दिवस:बुमराहचे पाच बळी; भारतीय संघाला आज विजयासाठी 157 धावांची गरज

नॉटिंगहॅमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान इंग्लंड क्रिकेट संघाच्या कर्णधार ज्याे रुटने (१०९) शनिवारी भारतीय संघाविरुद्ध सलामी कसाेटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक साजरे केले. याच खेळीच्या आधारे इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ८५.५ षटकांत ३०३ धावा काढल्या. यासह इंग्लंड संघाने पाहुण्या भारतासमाेर आता २०९ धावांचे लक्ष्य ठेवलेे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने चाैथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ५२ धावा काढल्या. यातून टीम इंडियाला आज रविवारी पाचव्या शेवटच्या दिवशी विजयी सलामी देण्याची माेठी संधी आहे. आता १५७ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर राेहित शर्मा (१२) आणि चेतेश्वर पुजारा (१२) मैदानावर कायम आहे.

सलामीवीर लाेकेश राहुल २६ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडने बाद केले. इंग्लंडने कालच्या बिनबाद २५ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार पाच विकेट घेतल्या. तसेच युवा गाेलंदाज माे. सिराज आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. यातून इंग्लंडचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. यादरम्यान इंग्लंड संघाकडून रुटची खेळी काैतुकास्पद ठरली. त्याने यंदाच्या सत्रात कसाेटी फाॅरमॅटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारची कामगिरी करणारा रुट हा जगातील एकमेव कसाेटी फलंदाज ठरला. भारतीय संघाकडून माे.शमी, सिराज व शार्दूल ठाकूर यांची गाेलंदाजी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे इंग्लंड संघाचे इतर फलंदाज अपयशी ठरले.

बातम्या आणखी आहेत...