आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs England 2nd ODI LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Prasidh Krishna KL Rahul | Maharashtra Cricket Association Stadium Pune News | IND Vs Eng Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनडे मालिका:टीम इंडियाच्या सलग पाचव्या वनडेत 300+ धावा; सुमार गाेलंदाजीने झाला तिसरा पराभव

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाहुण्या इंग्लंड संघाची मालिकेत 1-1 ने बराेबरी; उद्या रविवारी तिसरा शेवटचा सामना रंगणार

सलामीवीर जेसन राॅयसह (५५) सामनावीर बेअरस्टाे (१२४) आणि बेन स्टाेक्सच्या (९९) तुफानी फटकेबाजीच्या बळावर इंग्लंड संघाने यजमान टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. जाेस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने शुक्रवारी दुसऱ्या आणि आपल्या निर्णायक वनडेत भारतीय संघाला पराभूत केले. इंग्लंडने ४३.३ षटकांत सहा गड्यांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना लाेकेश राहुल (१०८), काेहली (६६) आणि ऋषभ पंतच्या (७७) खेळीच्या आधारे टीम इंडियाने सहा गड्यांच्या माेबदल्यात इंग्लंडसमाेर ३३७ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात इंग्लंडने चार गडी गमावून विजयाचे लक्ष्य सहज गाठले. यासह पाहुण्या इंग्लंड टीमने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना उद्या रविवारी याच मैदानावर हाेणार आहे. टीम इंडियाने सलग पाचव्या वनडे सामन्यात ३०० पेक्षा अधिक धावसंख्या रचली. मात्र, सुमार गाेलंदाजीमुळे टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यामध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

लाेकेश राहुलचे शतक व्यर्थ
टीम इंडियाच्या लाेकेश राहुलने दुसऱ्या वनडेत १०८ धावांची खेळी केली. मात्र, पराभवाने त्याचे हे शतक व्यर्थ ठरले. काेहली (६६), यष्टिरक्षक फलंदाज ऋषभची (७७) खेळी अपयशी ठरली.

उद्या निर्णायक सामना
टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न जाॅनी बेयरस्ट्राे आणि बेन स्टाेक्सने हाणून पाडला. इंग्लंडने दुसरा वनडे सामना जिंकला. यासह टीमने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. आता उद्या रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा निर्णायक वनडे सामना हाेणार आहे.

टीमने स्वत:हून पत्करला पराभव; ४ गोलंदाजांना खेळवणे महागात
टीम इंडियाला वनडे सामन्यात पुन्हा एकदा चार नियमित गोलंदाजांना खेळवण्याची माेठी किंमत चुकवावी लागली. हाच निर्णय टीम इंडियाच्या मालिका विजयाच्या प्रयत्नामध्ये अडसर ठरला. गोलंदाजांसाठी मदतगार असलेल्या खेळपट्टीवर फक्त चार नियमित गोलंदाजांना खेळवणे, खऱ्या अर्थाने चुकीचे ठरले. त्यामुळेच दुसऱ्या वनडे सामन्यासाठी रचलेला डावपेच हा अधिकच सुमार ठरला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये प्लॅनिंगचा अभाव असल्याचे पूर्णपणे दिसून आले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध हे अडचणीचे ठरले नाहीत. मात्र, समस्या ही दाेन फिरकीपटू कृणाल व कुलदीपसाेबत हाेती. त्यामुळेच टीमला अपेक्षितपणे यश संपादन करता आले नाही. २०१९ नंतर आत्मविश्वास गमावल्यासारखा कुलदीप यादव खेळत हाेता. कृणाल हा गोलंदाजीपेक्षा फलंदाजांच्या भूमिकेत असताे. सहावा पर्याय म्हणून हार्दिक आहे, जाे गोलंदाजी करत नाही. त्यामुळे भारतीय संघाचे नुकसान झाले. टाॅप आॅर्डरमध्ये काेणीही गाेलंदाजी करत नाही. त्यामुळे आता याच पराभवातून टीम इंडियाने धडा घेण्याची गरज आहे. भारतीय संघाला हीच उणीव भरून काढण्यासाठी काम करण्याची गरज आहे. भारत वनडे फाॅरमॅटमधील सर्वात यशस्वी संघ मानला जाताे. भारतीय संघाने १९८३ विश्वचषक, १९८५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप, २०११ विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली.

बेअरस्टाेचे झंझावाती शतक; स्टाेक्सचे १० उत्तुंग षटकार
इंग्लंडच्या विजयासाठी सलामीवीर जाॅनी बेअरस्टाेने (१२४) शानदार शतकी खेळी केली. यासह सलामीवीर जेसन राॅयसाेबत (५५) पहिल्या विकेटसाठी ११० धावांची दमदार भागीदारी रचली. त्याने ११२ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार व सात षटकारांसह १२४ धावांची झंझावाती खेळी केली. यादरम्यान त्याच्यासाेबत शतकी भागीदारी करताना जेसन राॅयने अर्धशतक झळकावले. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर आलेल्या बेन स्टाेक्सने तुफानी फटकेबाजी केली. त्याने ५२ चेंडूंत ९९ धावा काढल्या. यामध्ये १० षटकार व चार चाैकारांचा समावेश आहे. त्याच्या शतकाला भुवनेश्वरने हुलकावणी दिली.

बातम्या आणखी आहेत...