आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी सीरिजचा दुसरा सामना चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात 7 गडी बाद 200+ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत 400+ धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली 62 धावांवर आउट झाला. याशिवाय, अश्विनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सध्या रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव क्रीजवर आहेत.
सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी 1 गडी बाद 54 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाने एक धाव करताना चेतेश्वर पुजारा (7) धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही जास्तवेळ टिकू शकला नाही आणि 26 धावांवर बाद झाला. जॅक लीचच्या चेंडूवर यष्टिरक्षक बेन फोक्सने त्याला यष्टीचीत केले. शुभमन गिल (14) दुसऱ्याच दिवशी लीचचा शिकार ठरला होता.
जॅक लीचने 3 आणि मोइन अलीने 2 बळी घेतले
भारताच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचे फिरकीपटू जॅक लीचने 3 आणि मोइन अलीने 2 गडी बाद केले. लीचने रोहित, शुभमन आणि ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवला. तर मोइन अलीने अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेलला बाद केले.
इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावा करता आल्या
दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 329 धावा केल्या. रोहित शर्माने 161 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड टीम रोहितच्या स्कोर इतक्याही धावा करू शकली नाही. इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 195 धावांची आघाडी मिळाली.
अक्षरने कसोटी पदापर्णात रुटला बाद केले
इंग्लंडची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. इंशात शर्माने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंशातने सलामीवीर रोरी बर्न्सला शून्यावर एलबीडब्ल्यू केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्षरने जो रूटला बाद केले. मागील कसोटीत द्विशतक करणारा जो रूट यावेळी केवळ 6 धावा करू शकला.
अश्विनने 5 बळी घेतले
रविचंद्रन अश्विनने ओपनर डॉम सिबली (16), डॅन लॉरेंस (9), बेन स्टोक्स (18), ओली स्टोन (1) आणि स्टुअर्ट ब्रॉड (0)ला आउट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.