आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs England 3rd ODI LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Rishabh Pant KL Rahul | Maharashtra Cricket Association Stadium Pune News | IND Vs Eng Live Cricket Score Latest News Update

इंडिया vs इंग्लंड तिसरा वनडे:अखेरच्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा 7 धावांनी पराभव, भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश टीमला तिन्ही फॉर्मेटमध्ये मात

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश टीमला 52 दिवसात तिन्ही फॉर्मेटमध्ये चाखली पराभवाची धुळ

टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या आणि अखेच्या वनडे सामन्यात 7 धावांनी पराभूत केले आहे. यासोबतच भारतीय टीमने पुण्यात झालेल्या 3 वनडे सीरीज 2-1 ने खिशात घातली. फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश टीमला 52 दिवसात तिन्ही फॉर्मेटमध्ये पराभवाची धुळ चाखली आहे. भारताने 5 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या 4 टेस्ट सीरीजमध्ये 3-1 , 5 टी-20 सीरीजमध्ये 3-2 आणि आज 3 वनडे सीरीजमध्ये 2-1 ने पराभूत केले. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

या अखेरच्या निर्णायक सामन्यात टॉस हारुन प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमने 48.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 329 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लिश टीम 9 विकेट गमावून 322 धावांची मजल मारू शकली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक 95 धावा केल्या. त्या पाठोपाठ डेविड मलानने 50 बॉलमध्ये 50 , लियाम लिविंगस्टोने 36 आणि बेन स्टोक्सने 35 रन केले.

शार्दुलने घेतल्या 4 विकेट

सीरीजमध्ये पहिल्यांदा इंग्लंडची खराब सुरुवात राहिली. इंग्लंडने 28 धावांवर 2 विकेट गमावल्या. भुवनेश्वरने दोन्ही ओपनर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोला पवेलियनमध्ये पाठवले. यानंतर टी नटराजनने बेन स्टोक्सला 35 रनावर आउट केले. यानंतर शार्दूल ठाकुरने कर्णधार जोस बटलरला 15 रनांवर LBW केले. यानंतर शार्दुलने लियाम लिविंगस्टोन (36 रन) मलानश्(50) आउट केले. यानंतर भुवनेश्वरने मोइन अली आणि नंतर शार्दुलने रशीदला आउट केले.

भारताची वेगवान सुरुवात

भारतीय टीमने वेगवान सुरूवात करताना 14 ओव्हरमध्ये 100 रन काढले. 103 च्या स्कोअरवर भारताला पहिला झटका लागला. ओपनर रोहित शर्मा 37 धावांवर स्पिनर आदिल रशीदच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला. रशीदने 117 धावांवर भारताला दुसरा झटका दिला. रशिदने शिखर धवनला 67 धावांवर कॅच आउट केले. यानंतर मोइन अलीने भारतीय कर्णधार विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत भारताला तिसरा धक्का दिला. कोहली 10 बॉलमध्ये 7 रन काढून आउट झाला. यानंतर स्पिन ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोनने लोकेश राहुलला कॅच आउट केले.

येथून ऋषभ पंत और हार्दिक पंड्याने 73 बॉलमध्ये 99 रनांची पार्टनरशिप करत टीमला 250 धावांच्या पुढे नेले. 256 रनानर टॉम करनने पंतला आउट केले. यानंतर हार्दिकही बेन स्टोक्सच्या बॉलवर आउट झाला. येथून क्रुणाल पंड्या आणि शार्दूल ठाकुरने 7 व्या विकेटसाठी 42 बॉलमध्ये 45 रनांची पार्टनरशिप करत भारताला 320 रनांवर नेले.

कर्णधार कोहलीचा हा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी (कसोटी, एकदिवसीय, टी-20) हे तिन्ही फॉर्मेट मिळून हा त्यांचा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. अशी कामगिरी करणारे ते जगातील आठवे आणि भारताचे तिसरे खेळाडू आहे. जगात महेंद्र सिंह धोनी यांनी आतापर्यंत 332 सामन्यांचा कर्णधार राहणारा पहिला खेळाडू आहे.

दोन्ही संघ

भारतः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार / विकेटकीपर), डेव्हिड मालन, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, मार्क वुड, आदिल रशीद आणि रीस टोपली.

बातम्या आणखी आहेत...