आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 25 धावांनी पराभव केला. चौथा कसोटी सामना शनिवारी तिसर्या दिवशी संपला. यासह भारताने 4 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. आता भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांचा सामना 18 जून रोजी लॉर्ड्स येथे न्यूझीलंडशी होईल.
चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने ऋषभ पंतच्या 101 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 96 धावांच्या मदतीने 365 धावा केल्या. तसेच पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघाला ही आघाडी मिळवता आली नाही आणि सामन्याच्या तिसर्या दिवशीच 135 धावांवर डाव गुंडाळला. सामन्यात अक्षर पटेलने 9 (4, 5) गडी बाद केले आणि रविचंद्रन अश्विनने 8 (3, 5) बळी घेतले. पंतची सामनावीर म्हणून निवड झाली.
रोहित मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय
भारतीय संघाला मालिका जिंकवण्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासह स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या मालिकेत रोहित सर्वाधिक 345 धावा करणारा भारतीय होता. दुसर्या क्रमांकावर पंतने 270 धावा केल्या. रोहितने 161 धावा केल्या तर पंतने 101 धावांचे शतकही ठोकले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.