आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी कसाेटी:शार्दूल, ऋषभच्या अर्धशतकाने इंग्लंडला 368 धावांचे लक्ष्य, भारताच्या दुसऱ्या डावात 466 धावा

लंडन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाच्या जबरदस्त फाॅर्मात असलेला युवा खेळाडू शार्दूल ठाकूरने रविवारी यजमान इंग्लंड संघाविरुद्ध चाैथ्या कसाेटीत सलग दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक ठाेकून टीम इंडियाला माेठी आघाडी मिळवून दिली. शार्दूल (६०) आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (५०) शतकी भागीदारी केली. यातून टीम इंडियाने चाैथ्या दिवशी १४८.२ षटकांत दुसऱ्या डावात ४६६ धावा काढल्या. भारताने २९ डावानंतर पहिल्यांदाच ४००+ धावसंख्या उभी केली. यासह भारताने आता इंग्लंडसमाेर विजयासाठी ३६८ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने चाैथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद ७७ धावा काढल्या. अद्याप २९१ धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडचा सलामीवीर राॅरी बर्न्स (३१) व हमीद (४३) मैदानावर आहेत. आता भारतीय गाेलंदाजांना शेवटच्या दिवशी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

भारतीय संघाने कालच्या ३ बाद २७० धावांवरून चाैथ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, कर्णधार विराट काेहलीचा (४४) अर्धशतकी खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला.

२०१९ नंतर भारताच्या एका डावात ४००+ धावसंख्या नाेंद
भारतीय संघाने आेव्हल कसाेटीच्या दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करताना विक्रमाला गवसणी घातली. भारताने दुसऱ्या डावात ४००+ पेक्षा अधिक धावसंख्या उभी केली. यातून भारताला २०१९ नंतर पहिल्यांदाच डावात ४००+ पेक्षा अधिक धावांचा डाेंगर उभा करता आला. यापूर्वी टीम इंडियाने २०१९ मध्ये इंदूर येथे बांगलादेशविरुद्ध कसाेटीत ६ बाद ४९३ धावसंख्या रचली हाेती.

शार्दूलचे सलग दुसरे अर्धशतक; दाेन डावांत ५०+ धावा काढणारा जगात नववा फलंदाज
भारतीय संघाकडून शार्दूल ठाकूरने अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने चाैथ्या कसाेटीच्या दाेन्ही डावांत शानदार वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. यासह शार्दूल हा आठ वा त्यापेक्षा कमी स्थानावरून कसाेटीच्या दाेन्ही डावात अर्धशतकी खेळी करणारा जगातील नववा फलंदाज ठरला. त्याने आता शानदार ६० धावांची खेळी केली. त्याने पहिल्या डावात ५० धावा काढल्या आहेत. याशिवाय त्याने ऋषभ पंतसाेबत सातव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली. आता शार्दूलने ७२ चेंडूंमध्ये सात चाैकार व एका षटकारातून ६० धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...