आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India VS England Cricket Match | Marathi News | Indian Youth Team's Record Fifth World Title; India's Raj Bawa Took Five Wickets And Ravi Kumar Four

अंडर-19 वर्ल्ड कप:भारतीय युवा संघाचे विक्रमी पाचवे विश्वविजेतेपद; फायनलमध्ये इंग्लंडवर 4 गड्यांनी मात, इंग्लंड संघ पहिल्यांदा ठरला उपविजेता

नाॅर्थ साऊंड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 वर्षांखालील विश्वचषक भारताची फायनलमध्ये इंग्लंडवर 4 गड्यांनी मात

राज बावा (५/३१) आणि रवी कुमार (४/३४) यांच्या धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ निशांत सिंधू ( नाबाद ५०), रशिदने (५०) झंझावाती खेळी करून भारतीय संघाला आयसीसीच्या विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. यासह भारतीय संघाने विक्रमी पाचव्यांदा आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक पटकावला. भारतीय संघाने फायनलमध्ये १९९८ च्या चॅम्पियन इंग्लंडला पराभूत केले.

यश धुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने शनिवारी ४७.४ षटकांत चार गड्यांनी सामना जिंकला. संघाच्या विजयात महाराष्ट्राच्या काैशल तांबे, राजवर्धन आणि विकी ओस्तवालचे महत्त्वपूर्ण याेगदान ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ४४.५ षटकांत १८९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. इंग्लंड टीम पहिल्यांदाच विश्वचषकात उपविजेती ठरली आहे.

विश्वविजेत्या युवा टीमवर काैतुकांचा वर्षाव
विश्वविजेत्या भारतीय युवा संघावर काैतुकांचा वर्षाव झाला. एनसीए इनपुट हेड व्हीव्हीएस लक्ष्मणसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुली, सचिव जय शाह यांनी विजेत्या संघाचे खास काैतुक केले.

यश धुल ठरला पाचवा कर्णधार!
आयसीसीचा १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघाला मिळवून देणारा यश धुल हा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी असा पराक्रम माे.कैफ (२०००), विराट काेहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२) आणि पृथ्वी शाॅने (२०१८) गाजवला आहे.

विक्रमी कामगिरी
शेख रशिदने विश्वचषकात तीन अर्धशतके आपल्या नावे नाेंद केली. त्याने फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार ५० धावांची खेळी केली. भारताकडून यश धुल हा यंदाच्या विश्वचषकामध्ये शतकवीर कर्णधार ठरला. यासह त्याने कर्णधाराच्या भुमिकेत भारताचा तिसरा शतकवीर हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे.
महाराष्ट्राच्या राजवर्धन, काैशल, विकीची ठरली लक्षवेधी खेळी

संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : ४४.५ षटकांत सर्वबाद १८९ धावा
जेम्स ९५, जेम्स सेल्स नाबाद ३४, रवी कुमार ४/३४, राज बावा ५/३१)
भारत : ४७.४ षटकांत ६ बाद १९५ धावा : (निशांत नाबाद ५०, रशिद ५०)

उस्मानाबादच्या युवा राजवर्धन हंगरगेकरची युवांच्या विश्वचषकातील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने सहा सामन्यात आठ विकेट घेतल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५३ धावांत ३ बळींच्या सर्वाेत्तम कामगिरीचा समावेश. फलंदाजीत ५२ धावा काढल्या.

पुण्यातील युवा गाेलंदाज विकी ओस्तवालची खेळी काैतुकास्पद ठरली. त्याने विश्वचषकाच्या पाच सामन्यात १२ बळी घेतले. यामध्ये १५ जानेवारी राेजी आफ्रिकेविरुद्ध सामन्यातील सर्वाेत्तम ५ बळींचा समावेश आहे.

पुण्यातील काैशल तांबेने स्पर्धेतील पाच सामन्यात चार बळी घेतले. यादरम्यान त्याने आयर्लंडविरुद्ध सामन्यात ९ धावा देत २ बळी घेण्याची कामगिरी केली. तसेच त्याने फायनलमध्ये १ बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...