आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसाेटी:आशियामध्ये 400+ धावांचे लक्ष्य कठीण; 100+ षटके खेळण्याचे भारतासमाेर आव्हान

चेन्नईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अश्विनचे सहा बळी; इंग्लंड संघाचा दुसऱ्या डावात १७८ धावांत खुर्दा

पहिल्या डावात धावांचा डाेंगर रचणाऱ्या पाहुण्या इंग्लंड संघाचा टीम इंडियाविरुद्ध सलामी कसाेटीच्या दुसऱ्या डावात १७८ धावांत खुर्दा उडाला. यात अश्विनने सहा विकेट घेऊन इंग्लंडचा माेठ्या खेळीचा प्रयत्न हाणून पाडला. यातून आता टीम इंडियासमाेर विजयासाठी ४२० धावांचे खडतर लक्ष्य आहे. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात चाैथ्या दिवसअखेर साेमवारी एका गड्याच्या माेबदल्यात ३९ धावा काढल्या. आता ३८१ धावांनी पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाकडे नऊ विकेट शिल्लक आहेत. त्यामुळे टीम इंडियाला शेवटच्या दिवशी मंगळवारी माेठी खेळी करावी लागणार आहे. टीमचा युवा फलंदाज शुभमान गिल (१५) आणि चेतेश्वर पुजारा (१२) मैदानावर कायम आहेत. टीमचा सलामीवीर राेहित शर्मा १२ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

अश्विनच्या २८ व्यांदा सहा विकेट :
टीम इंडियाच्या आर.अश्विनने चाैथ्या दिवशी इंग्लंडची दुसऱ्या डावात चांगलीच दमछाक केली. त्याने सहा बळी घेतले. यासह त्याने इंग्लंडच्या अव्वल फलंदाजांना स्वस्तात बाद करण्याचा पराक्रम गाजवला. यातून त्याला आपल्या कसाेटी करिअरमध्ये २८ व्यांदा डावात ६ बळी घेण्याची कामगिरी नाेंदवता आली.

ईशांतच्या ३०० विकेट पूर्ण; भारताचा सहावा गाेलंदाज
भारतीय संघाच्या वेगवान गाेलंदाज ईशांत शर्माने कसाेटी करिअरमध्ये ३०० विकेट पूर्ण केल्या आहेत. त्याने लाॅरेन्सची विकेट घेतली. यासह त्याला बळींचा ३०० चा आकडा गाठता आला. अशा प्रकारची कामगिरी करणारा ईशांत हा भारताचा सहावा गाेलंदाज ठरला. यापूर्वी असा पराक्रम अश्विन, अनिल कुंबळे, हरभजन, कपिलदेव आणि जहीर खानने गाजवला आहे.

भारतीय संंघावर गुणांच्या कारवाईची शक्यता; फायनलमधील प्रवेश सापडेल अडचणीत
टीम इंडियाला आपल्या घरच्या मैदानावर दुसऱ्या डावातील संथ गाेलंदाजी महागात पडण्याचे चित्र आहे. टी टाइमनंंतर भारतीय संघाने ९० मिनिटांत फक्त १९.३ षटके गाेलंदाजी केली. म्हणजेच प्रतितासात १३ षटके पडली. याच संथ गाेलंदाजीप्रकरणी आता आयसीसी टीम इंडियावर चार गुणांची पेनल्टी लावण्याची शक्यता आहे. कारण, नियमानुसार एक षटक कमी टाकल्याने दाेन गुणांची कपात केली जाते. म्हणजेच टीमचे चार गुणांचे नुकसान हाेईल. याचा माेठा फटका टीमला वर्ल्ड कसाेटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेश अडचणीत सापडणार आहे. सध्या टीम इंडियाला हा पल्ला गाठण्याची संधी आहे. न्यूझीलंड संघाने ही फेरी गाठली आहे.

बातम्या आणखी आहेत...