आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs England Manchester Test LIVE Score Update; Rohit Sharma Shardul Thakur Virat Kohli | IND ENG 5th Test Day 1 Latest News And Update

मँचेस्टर कसोटीवर कोरोनाचे सावट:फिजिओची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे पाचवी कसोटी रद्द; वॉकओव्हर मानून इंग्लंड संघाला विजेता घोषित केले पाहिजे - ईसीबी

मँचेस्टरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसोटीबाबत काही खेळाडूंनी व्यक्त केली होती चिंता

क्रिकेट प्रेमींसाठी मँचेस्टरमधून एक वाईट बातमी येत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. बीबीसीच्या माहितीनुसार, भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. परंतु, याचा अंतिम अहवाल आज येईल. त्यामुळे अंतिम अहवालात कोणी खेळाडू पॉझिटिव्ह आल्याचे सध्यातरी स्पष्ट करण्यात आलेले नाही.

खेळाडूंच्या नकाराला वॉकओव्हर मानले पाहिजे - ईसीबी
भारतीय संघातील फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयने खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिल्याचे ईसीबीला सांगितले आहे. परंतु, यावर ईसीबीने म्हटले की, जर खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला असेल तर याला वॉकओव्हर मानून इंग्लंड संघाला विजेता घोषित केले पाहिजे. परंतु, या निर्णयाला बीसीसीआयने नकार दिला आहे.

कसोटीबाबत काही खेळाडूंनी व्यक्त केली होती चिंता
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान आज शेवटचा कसोटी सामना होता. परंतु, भारतीय संघातील फिजीओ पॉझिटिव्ह आल्याने भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. कसोटी सामन्याबाबत ECB आणि BCCI मध्ये झालेल्या चर्चेनुसार बीसीसीआयने आमचे खेळाडू क्रिकेट खेळणार नाही असे सांगितले. दरम्यान, बोर्ड खेळाडूंच्या आरोग्याबाबत चिंतेत आहे. कारण काही दिवसापूर्वी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे या कसोटी सामन्याबाबत काही खेळाडूंनी चिंता देखील व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...