आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs England ODI Series, Indian Squad List Updates; Suryakumar Yadav, Rishabh Pant, Rohit Sharma | ODI Series Schedule

वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा:सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णाला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी, ऑलराउंडर कृणाल पंड्याही संघात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 मध्ये पदार्पण करणारा खेळाडू सूर्यकुमार यादवला वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. ऑलराउंडर क्रुणाल पंड्या आणि फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णालाही पहिल्यांदाच वनडे टीममध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेला खेळाडू मोहम्मद सिराजलाही 18 खेळांडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. भारत आणि इंग्लडमध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज 23 मार्चपासून पुण्यात सुरु होत आहे.

अशाप्रकारे आहे संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार) शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकुर.

बातम्या आणखी आहेत...