आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी कसाेटी:50 वर्षांनंतर भारताचा ओव्हल मैदानावर विजय, 2-1 ने मालिकेत आघाडी; 10 सप्टेंबरपासून रंगणार पाचवी कसाेटी

लंडन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने शार्दूल ठाकूर (२/२२), जसप्रीत बुमराह (२/२७), रवींद्र जडेजा (२/५०) व उमेश यादवच्या (३/६०) शानदार गाेलंदाजीच्या बळावर साेमवारी चाैथ्या कसाेटीत यजमान इंग्लंडवर मात केली. भारताने १५७ धावांनी शानदार विजय संपादन केला. सामनावीर राेहित शर्माने (१२७) दुसऱ्या डावात शतक साजरे करून टीम इंडियाचा कसाेटीतील विजयी मालिका कायम ठेवली. त्याच्या शतकी खेळीतून भारताने आतापर्यंत आठ कसाेटी सामने जिंकले. यासह शतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व आॅस्ट्रेलियामध्ये विजय मिळवून देणारा राेहित हा आशियातील पहिला फलंदाज ठरला. त्यामुळे दुसऱ्या डावातील राेहित शर्माचे शतक हे भारतीय संघासाठी लकी मानले जाते.

यासह काेहली हा टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात कसाेटीत सर्वाधिक ३७ विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला. खडतर ३६८ धावांच्या प्रत्युत्तरात दमछाक झालेल्या इंग्लंड संघाला शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात २१० धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर राॅरी बर्न्स (५०) आणि हमीदने (६३) दिलेली झंुज व्यर्थ ठरली. या शानदार विजयासह टीम इंडियाने पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. आता मालिकेतील निर्णायक पाचवा आणि शेवटचा कसाेटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये रंगणार आहे. इंग्लंडने कालच्या बिनबाद ७७ धावांवरून खेळण्यास सुुरुवात केली. सलामीच्या बर्न्स व हमीदने संंंघाला शतकी भागीदारीची सलामी दिली. मात्र, दुसऱ्या डावातील अर्धशतकवीर शार्दूलने बर्न्सला बाद करून संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठाेपाठ डेव्हिड मलान धावबाद झाला. दरम्यान हमीदने अर्धशतक साजरे केले. त्याला आॅलराउंडर जडेजाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर इंग्लंड टीमची पडझड सुरू झाली.

बुमराहचे वेगवान ‘शतक’ : टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने चाैथ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात लक्षवेधी कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात यजमान इंंग्लंड संघाच्या आेली पोपला त्रिफळाचीत केले. यासह बुमराहने कसाेटीमध्ये वेगवान १०० बळी पूर्ण केले. त्याने २४ कसाेटीत यश मिळवले. त्याने वेगवान १०० बळीत कपिलदेवला मागे टाकले. कपिलदेव यांच्या नावे २५ कसाेटीत १०० बळींची नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...