आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Hong Kong Asia Cup 2022 Memorable Moments; Rohit Sharma Virat Kohli Suryakumar Yadav, Five Great Moments From India Hong Kong Match: Virat Kohli Praises Surya, Rohit Sharma's World Record And Free Hit Wicket

भारत-हाँगकाँग सामन्याचे पाच शानदार मोमेंट्स:विराट कोहलीने दिली सूर्याला दाद, रोहित शर्माचा विश्वविक्रम आणि फ्री हिट्सवर विकेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कप 2022 मध्ये सुपर-4 मध्ये पोहोचणारा भारत हा दुसरा संघ बनला आहे. भारताने त्याचे दोन्ही साखळी सामने जिंकले आहेत. रोहितच्या टीमने बुधवारी पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा आणि दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारत-हाँगकाँग सामन्यातील 5 संस्मरणीय क्षण पाहूया जे नेहमी आपल्या लक्षात राहतील .

5. रोहित शर्माने रचला इतिहास

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रम केला आहे. सामन्याच्या पहिल्याच षटकात त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 3,500 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

रोहितने 2007 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्याच्या नुसार त्याला कामगिरी काही करता आली नाही. मात्र 2013 मध्ये त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली आणि तेव्हापासून त्याने मागे कधीच वळून पाहिले नाही.

गेल्या 5 वर्षात रोहितने 72 टी-20 इंटरनॅशनल सामने खेळले असून त्यात त्याने 2,156 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके झळकवली आहेत.

रोहित शर्मानंतर मार्टिन गुप्टीलने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (3,487) केल्या आहेत.
रोहित शर्मानंतर मार्टिन गुप्टीलने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (3,487) केल्या आहेत.

4. विराटचे 6 महिन्यांनंतर अर्धशतक

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा गेल्या तीन वर्षात फॉर्म चांगला दिसला नाही. विराट गेली 3 वर्षे प्रत्येक धावा काढण्यासाठी झगडत होता. कोहलीने बुधवारी हाँगकाँगविरुद्ध टी-20मध्ये सहा महिन्यांनंतर पहिले अर्धशतक झळकावले. कोहलीने त्याच्या दोन अर्धशतकांमध्ये तब्बल 11 डावांचे अंतर होते.

हाँगकाँगविरुद्धच्या खेळीत कोहलीने 134 च्या स्ट्राईक रेटने 59 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावले. कोहलीला त्याच्या खराब कामगिरीमुळे लोकांच्या तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहली मैदानात आला तेव्हा लोकांना अपेक्षा होती की तो मोठी खेळी खेळेल, पण त्यावेळी त्याने केवळ 35 धावा काढल्या

विराट कोहलीने 11 डावानंतर अर्धशतक झळकावले आहे.
विराट कोहलीने 11 डावानंतर अर्धशतक झळकावले आहे.

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराटच्या बाबतीत वेगळे सांगायचे म्हणजे त्याने यावेळी गोलंदाजीही केली विराट 6 वर्षांनंतर T-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. त्याने 2020 मध्ये क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटची गोलंदाजी केली होती.

जेव्हा टी-20 क्रिकेटचा विचार केला तर विराटने शेवटची 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजी केली होती. या सामन्यात विराटने 1 बळीही घेतला होता, पण त्यावेळी भारताने हा सामना हरला होता आणि विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला होता

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना विराट कोहली.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना विराट कोहली.

3. सूर्यकुमारने शेवटच्या षटकात ठोकले चार षटकार

  • सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलेच नाव कमावले आहे. हाँगकाँगविरुद्ध मैदानात येताच या खेळाडूने पहिल्या दोन चेंडूत सलग दोन चौकार मारले. शेवटच्या षटकात, त्याने 360 डिग्रीत खेळ खेळत 4 षटकार मारले.
  • सुर्या स्ट्राईकवर असल्याने त्याचा दबाव गोलंदाज हारून अर्शदवर स्पष्ट दिसत होता. या दबावामुळे त्याने आपला पहिला चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर फुल्लटॉस टाकला. कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या सुर्यासाठी ही चांगलीच भेट होती. सुर्याने कव्हरवर लाँग सिक्सर मारला.
  • दुसऱ्या चेंडूवरही गोलंदाजाने फलंदाजाला ऑफ-साइडमध्ये बरीच जागा दिल्यामुळे त्याचा फायदा घेत त्याने डीप एक्स्ट्रा कव्हरवर आणखी एक जोरदार षटकार मारला. या षटकारासह सूर्याने केवळ 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
  • तिसऱ्या चेंडूवर दडपणाखाली असलेल्या हारुणने सूर्याकडे फॉरवर्ड चेंडू टाकला, ज्याचा सुर्याने पुरेपूर फायदा उठवत गोलंदाजाच्या डोक्यावर स्ट्रेट फॉर्वड षटकार मारला.
  • षटकाच्या पाचव्या चेंडूवर हारुणने बॅक ऑफ लेन्थला गोलंदाजी केली. तर याचे उत्तरही सुर्याकडेही होते. त्याने आणखी एक स्कूप मारला. सूर्याचा हा फटका यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून गेला. 20व्या षटकाच्या अखेरीस त्याने 261 च्या स्ट्राईक रेटने 26 चेंडूत 68 धावा काढल्या.
सूर्यकुमार यादवची ही स्फोटक खेळी दीर्घकाळ स्मरणात राहील.
सूर्यकुमार यादवची ही स्फोटक खेळी दीर्घकाळ स्मरणात राहील.

2. फ्री हिटवर निझाकतची पडली विकेट

या सामन्यात एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे हॉंगकाँगकडून चांगला खेळ करणारा निझाकत खान हा फ्री हिटवर बाद झाला. वास्तविक, अर्शदीप सिंग सामन्याचा 6 वा षटक टाकण्यासाठी आला होता. पहिल्या चेंडूवर त्याचा पाय क्रीजच्या बाहेर गेल्यामुळे तो फ्रीहीट देण्यात आला.

फ्री हिटवर निझाकत खान पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलावतो. मात्र तिथे फिल्डिंगवर असणाऱ्या रवींद्र जडेजाने तो चेंडू पकडला आणि तिथूनच त्यानमे थेट स्टंपवर थ्रो मारला. जडेजाच्या बुलेट आर्म टाळण्यासाठी निझाकतला अधिक वेगाने धावण्याची गरज होती, मात्र तो धावबाद असल्याचं जोरदार अपील करण्यात आले. त्यानंतर थर्ड अंपायरला निझाकत क्रीजच्या बाहेर असल्याचे आढळून आल्यामुळे फ्री हिटवर त्याला बाद करण्यात आले

जडेजाच्या एका शानदार थ्रोवर निझाकत धावबाद झाला.
जडेजाच्या एका शानदार थ्रोवर निझाकत धावबाद झाला.

1. डोळे वटारण्यापासून दाद देण्यापर्यंतचा विराटचा प्रवास

सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध 68 धावांची शानदार खेळी केली. या डावात सूर्याने 261 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. भारताचा डाव संपला तेव्हा विराट सूर्याची ही शानदार खेळी पाहून त्याला दाद देण्यासाठी म्हणून त्याला झुकून नमस्कार केला.

हा तोच विराट आहे ज्याने 2020 च्या IPL मधील 38 व्या सामन्यात सूर्यकुमार यादवला स्लेज केले होते. स्लेजिंगच्या वेळी विराटने सूर्यावर डोळेही वटारले होते, मात्र सूर्या त्यावेळी काहीच बोलला नाही. प्रत्युत्तर देताना त्याने 43 चेंडूत 79 धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.

हाँगकाँगविरुद्ध आपल्या शानदार फलंदाजीने सूर्यकुमार यादवने विराटला त्याचा चाहता बनायला भाग पाडले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 92 धावांची भागीदारीही केली.

IPL 2020 दरम्यान विराट कोहली सूर्याला डोळे वटारताना
IPL 2020 दरम्यान विराट कोहली सूर्याला डोळे वटारताना
भारताच्या डावानंतर, विराटने सूर्यकुमार यादवला दाद दिली आणि शानदार खेळीसाठी त्याला सलाम केला.
भारताच्या डावानंतर, विराटने सूर्यकुमार यादवला दाद दिली आणि शानदार खेळीसाठी त्याला सलाम केला.
बातम्या आणखी आहेत...