आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने तो 8 विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
या सामन्यादरम्यान अनेक मनोरंजक आणि मजेदार क्षण पाहायला मिळाले. सर्वात मजेशीर किस्सा आपला कर्णधार रोहित शर्माशी संबंधित होता. सामन्याच्या नाणेफेकीपासून पाहुया...
नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा कॉल घ्यायला विसरला
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमसह समालोचक रवी शास्त्री नाणेफेकीसाठी आले. यादरम्यान एक मजेदार घटना घडली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा निर्णय घेण्यास विसरला. नाणेफेक जिंकल्यानंतर रवी शास्त्रींनी त्याला काय करायचे आहे, असे विचारले. अशा स्थितीत संघाचा निर्णय काय होता हे रोहित विसरला. त्याला कॉल घेण्यासाठी सुमारे 20 सेकंद लागले. यानंतर तो म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत.
फॉलो-थ्रूमध्ये पांड्याचा अप्रतिम झेल किवी संघाच्या डावाच्या 10व्या षटकात हार्दिक पंड्याने फॉलो-थ्रूमध्ये अप्रतिम झेल टिपला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ड्वेन कॉनवेने गोलंदाज पांड्याच्या दिशेने एक शॉट खेळला. चेंडू जमिनीच्या अगदी जवळ होता आणि पडणारच होता, तेव्हा पांड्याने डायव्ह करत एका हाताने जबरदस्त झेल घेतला.
शमीही नव्हता मागे
रोहित-कुलदीपने झेल सोडले
20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माने मिशेल सँटनरचा मिडविकेटवर झेल सोडला. त्यानंतर 24व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुलदीपने सँटनरचा झेल सोडला. यावेळी कुलदीपच्या डोक्यावर चेंडू होता. तो स्वत: गोलंदाजीच्या आघाडीवर होता. कुलदीपने झेल घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंडू त्याच्या तळहातावरून उसळला आणि अंपायरच्या दिशेने गेला. भारतीय फिरकीपटूने झेल घेण्याचा आणखी एक प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. नंतर 27 धावांवर सँटनर पंड्याचा बळी ठरला.
मैदानात घुसला छोटा फॅन
भारतीय डावाच्या 10व्या षटकात एका छोट्या चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला. त्यावेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीझवर होते. चाहत्याने रोहितच्या दिशेने धाव घेतली आणि भारतीय कर्णधाराला मिठी मारली. दरम्यान, सुरक्षा कर्मचारीही पोहोचले. त्यानंतर रोहित शर्माने सुरक्षा कर्मचार्यांना त्या चाहत्यावर कारवाई न करण्याचे आवाहन केले.
पंड्याने मैदानावरच काढल्या पुशअप्स
फिल्डिंगदरम्यान हार्दिक पांड्या मैदानावर पुशअप्स करताना दिसला. या सामन्यादरम्यान त्याने आपला सर्वोत्तम फिटनेसही दाखवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.