आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामना 24 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ इंदूरला पोहोचले आहेत. यावेळी एक विशेष योगायोगही या सामन्यात असणार आहे.ते म्हणजे सामना ज्या शहरात आहे त्याच शहरातील खेळाडू असेल, तर त्याच्यावर सर्वांची नजर असते, पण यावेळी विशेष बाब म्हणजे इंदूरचा रहिवासी नितीन मेनन सामन्या दरम्यान मैदानात अंपायरिंग करताना दिसणार आहे.
40 वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल जिथे आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात इंदोरी अंपायर मैदानावर निर्णय देणार. नितीनच्या अंपायर वडिलांनाही त्याच्या जन्मगावी इंदूरमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरींग करण्याची इच्छा होती, पण त्यांना संधी मिळाली नाही, पण आपल्या मुलाला ही संधी मिळाली याचा त्यांना खूप आनंद आहे.
नितीनने आतापर्यंत जवळपास 90 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. चला जाणून घेऊया, त्याच्याबद्दल आणि त्याच्या वडिलांनी त्याला कोणता सल्ला दिला हे देखील सांगू,जो अजूनही त्याच्या मनात आहे.
नितीनच्या आधी त्याच्या पंच वडिलांबद्दल जाणून घ्या
नितीनचे वडील नरेंद्र मेनन हेही पंच राहिले आहेत. ते सांगतात, '1960 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी मी एमपी स्कूल टूर्नामेंट खेळलो. तेव्हा एमपी स्कूल आणि रणजी करंडक या दोनच स्पर्धा होत्या. त्यानंतर 1966 मध्ये मी रणजी खेळलो. रणजी खेळताना त्यांना दररोज 10 रुपये मिळायचे. आता ही रक्कम दररोज सुमारे दीड लाख रुपये झाली आहे.
सरावासाठी फक्त व्यायामशाळा होती. इंदूरमध्ये मॅटिन विकेटवर खेळले, रणजीमध्ये नागपूरच्या टर्फवर खेळायला मिळायचे. 1981 पर्यंत क्रिकेटपटू म्हणून खेळत राहिलो. यानंतर 1983 ते 1997 पर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये तो निवडकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं. दरम्यान,1982 मध्ये ते राज्यस्तरीय पंच बनले.
वडील म्हणाले - खेळाडूचा चेहरा बघून अंपायरिंग करू नकोस
इंदूरचा मुलगा नितीन मेनन याचे वडील नरेंद्र मेनन यांनीही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. इंदूरमध्ये होणार्या मॅच आणि नितीनच्या अंपायरिंगबाबत दिव्य मराठीशी झालेल्या चर्चेत वडील नरेंद्र मेनन काय म्हणाले ते आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगीतले की आमच्या 'संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटत आहे. आणि आम्ही सर्वजण मॅच पाहायलाही जाणार आहेत.
अंपायरिंगमध्ये प्रत्येकजण चुका करतो. कुणीच परिपूर्ण नाही. कोणीही हेतुपुरस्सर चूक करत नाही, परंतु काहीना काही तरी चूक होते. सामना कोणताही असो, अंपायरिंग म्हणजे अंपायरिंग असते. ज्युनियर मॅच असो किंवा रणजी ट्रॉफीचा मॅच असो. मी मुलाला नेहमी एकच सांगत आलो की, जर तुला चांगले अंपायरिंग करायचे असेल तर मग तो गोलंदाज असो, फलंदाज असो, तु जर चेहरा पाहून अंपायरिंग केलेस तर तू कधीच चांगले अंपायरिंग करू शकणार नाहीस.
म्हणजे, समजा कपिल देव समोर आला, आता विराट कोहली आहे, तर त्याचा चेहरा पाहून अनेक पंच घाबरतात. माझ्या मुलाला माझा सल्ला होता की तू तुझे काम कर, बॉल बघ, बॅट बघ, पॅड बघ आणि स्टंप बघ. जर तुम्ही फक्त यावर लक्ष केंद्रित केले तर तु खूप चांगला पंच बनू शकतो. नितीनने नेहमीच ही गोष्ट पाळली आणि आज तो इथपर्यंत पोहोचला आहे.
वडिलांनी सुद्धा 2004 पर्यंत अंपायरिंगही केले आहे
नितीनचे वडील नरेंद्र मेनन सांगतात, '1990 मध्ये BCCI ने अंपायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूची परीक्षा घेतली. यामध्ये केवळ अशाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी 40 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. परीक्षेतील 19 खेळाडूंपैकी माझ्यासह 10 खेळाडू उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुन्हा BCCI कडून सामन्यांमध्ये अंपायरिंगची संधी मिळाली. सन 2004 पर्यंत अंपायर राहिलो, नंतर वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झालो. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारत-झिम्बाब्वे आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांमध्ये मैदानावर भूमिका बजावली. इंदूरमध्ये त्यांनी तिसरे पंच म्हणून अंपायरींग केली आहे, पण ऑनफिल्डवर संधी मिळाली नाही. मुलाला ही संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
आता जाणून घेऊ या इंदूरचा मुलगा अंपायर नितीन बद्दल त्याच्याच वडिलांच्या शब्दातून...
वडील नरेंद्र मेनन सांगतात की, नितीनने वयाच्या 14 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पहिली तीन वर्षे 16 वर्षांखालील MPसंघाकडून खेळला, त्यानंतर 19 वर्षांखालील संघातही तीन वर्षे खेळला. चांगला क्रिकेटर म्हणून खेळत होता, पण 2007 मध्ये अचानक तो म्हणाला की मला अंपायर व्हायचे आहे. त्याने पंच होण्यामागचे कोणतेही खास कारण सांगितले नाही. यानंतर त्यांची मुले नितीन आणि निखिल यांनी अंपायरची विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर 2009 मध्ये नितीन याने BCCI अंपायरसाठी बोर्डाची परीक्षा दिली.
वयाच्या 22 व्या वर्षी नितीन BCCI चा अंपायर बनला. जगातील एलिट पॅनलमध्ये 11 पंच आहेत, ज्यात नितीनचा समावेश आहे. त्याला पॅनेलमध्ये सहभागी होऊन तीन वर्षे झाली आहेत. त्याचबरोबर नितीनसह आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कामगिरी करणाऱ्या 5 पंचांचा समावेश आहे. कामगिरीच्या आधारे BCCI पंचाच्या नावाची शिफारस ICC कडे करते.
नितीन मेनन म्हणाले - कदाचित हा माझा खास क्षण असेल
आतापर्यंत 90 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केलेले अंपायर नितीन मेनन म्हणतात, 'मीही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. आताकुठे मला संधी मिळाली आहे. मी खूप उत्साही आहे. हा माझा सर्वात खास क्षण असू शकतो. मी MP साठी क्रिकेट खेळायचो, पण कामगिरी चांगली नसल्याने मला संघातून वगळण्यात आले. 2006 मध्ये एक संधी घेतली आणि परीक्षेनंतर BCCI अंपायरिंगला सुरुवात केली.
तुम्ही माणूस असाल तर चुका तर या होतीलच. आज तंत्रज्ञानामुळे अंपायरिंग खूप आव्हानात्मक बनले आहे. डोळ्यांची तुलना तंत्रज्ञानाशी होऊ शकत नाही. तंत्रज्ञान असल्यामुळे तरआम्हाला आमचे चांगले निर्णय आणि चुका कळतात. मी माझ्या वडिलांचा सल्ला मानतो, ही गोष्ट माझ्या मनात खूप पूर्वीपासून बसली होती. त्यामुळे दबाव हाताळणे सोपे जाते, मग कोण गोलंदाजी किंवा फलंदाजी करत आहे याचा विचार होत नाही. विराट कोहली असो की रोहित शर्मा, तो LBW झाला तर आपल्याला त्याला आऊट द्यायलाच हवे.
पत्नी बँकिंग व्यावसायिक, क्रिकेटमध्ये फारसा रस नाही
नितीन मेनन यांच्या पत्नी संगीता यांनी दिव्य मराठीशी केलेल्या चर्चेत सांगितले की, 'नितीन होम टाऊनमध्ये अंपायरिंग करत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. इंदोरमध्ये आम्ही नितीनला पहिल्यांदाच पाहणार आहोत. मॅच पाहायला जाणार आहोतच.' त्या पुढे म्हणाल्या, 'त्याचं मैदान वेगळं, माझं वेगळं. मी बँकिंग व्यावसायिक आहे. ते कोणत्याही सामन्याबद्दल तपशीलवार सांगत नाहीत आणि मी त्यांना विचारत नाही. मला क्रिकेटमध्ये थोडासा इंटरेस्ट आहे, तोही लग्नानंतर झाला पण आधी नव्हता. नितीनला घरचे जेवण आवडते. ते बाहेरून खात नाहीत. मला इंदोरी जेवण आवडते. मी त्याला विचारले होते, त्याला रात्रीच्या जेवणात काय खायला आवडेल, तो म्हणाला फक्त डाळ, रोटी, भाजी करा. काही खास बनवायला सांगितले नाही.
मुलगा ऋषभलाही क्रिकेटर किंवा अंपायर व्हायचे आहे
नितीनचा मुलगा ऋषभ म्हणतो, 'मी चौथीत आहे. मला क्रिकेटची खूप आवड आहे. मला मोठा झाल्यावर क्रिकेटर किंवा अंपायर व्हायचे आहे. मी मॅच बघायला जाईन. मी फक्त माझ्या मोकळ्या वेळेत क्रिकेट बघतो. पप्पा खूप चांगले अंपायरिंग करतात.
1983 मध्ये इंदूर येथे झाला होता पहिला वनडे सामना
पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना 1 डिसेंबर 1983 रोजी इंदूरच्या नेहरू स्टेडियमवर खेळला गेला. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट असलेला देशातील एकमेव पंच नितीन हा यापूर्वी शहरात झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरा पंच होता.
6 वर्षांनंतर इंदूरमध्ये वनडे सामना
इंदूरमध्ये 6 वर्षांनंतर वनडे सामना होणार आहे आणि भारतीय संघाने होळकर स्टेडियमवर एकही वनडे सामना गमावलेला नाही, तर न्यूझीलंड इंदूरमध्ये कधीही जिंकलेला नाही. न्यूझीलंड संघाने ऑक्टोबर 2016 मध्ये इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कसोटी सामना खेळला आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव केला.
होळकर स्टेडियमवर आतापर्यंत झालेले आंतरराष्ट्रीय वनडे सामने..
मॅच | विजेता | विजयाचे अंतर | तारीख |
भारत-इंग्लंड | भारत | 7 विकेट | 15 एप्रिल, 2006 |
भारत-इंग्लंड | भारत | 54 धावा | 17 नोव्हेबंर, 2008 |
भारत-वेस्टइंडीज | भारत | 153 धावा | 8 डिसेंबर, 2011 |
भारत-द.आफ्रिका | भारत | 22 धावा | 14 ऑक्टोंबर, 2015 |
भारत-ऑस्ट्रेलिया | भारत | 5 विकेट | 24 सप्टेंबर, 2017 |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.