आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानपूर कसोटी:अय्यरचे स्वप्नवत पदार्पण; संघाला संकटातून वाचवले, भारताच्या पहिल्या दिवशी 4 बाद 258 धावा

कानपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघातील जुने आकर्षण परतले : द्रविडने पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूच्या हस्ते कॅप देण्याची संस्कृती पुन्हा एकदा सुरू केली. या सामन्यात अय्यरने पदार्पण केले. त्याला सुनील गावसकरने कॅप दिली. - Divya Marathi
संघातील जुने आकर्षण परतले : द्रविडने पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूच्या हस्ते कॅप देण्याची संस्कृती पुन्हा एकदा सुरू केली. या सामन्यात अय्यरने पदार्पण केले. त्याला सुनील गावसकरने कॅप दिली.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत मजबूत सुरुवात केली. ग्रीन पार्कमध्ये भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यात न्यूझीलंडने सर्व चारही वेळा नाणेफेक गमावली. भारतासाठी श्रेयस अय्यरने पदार्पण केले आणि माजी कर्णधार सुनील गावसकरने त्याला कॅप दिली.

मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ही सलामी जोडी लवकर फुटली. मयंकला अवघ्या १३ धावांवर काइल जेमिसनने बाद केले. २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध २४३ धावांची खेळी करणाऱ्या मयंकने १२ डावांत केवळ एक अर्धशतक काढले. गिल (५२) कसोटीत चौथे अर्धशतक झळकवल्यानंतर जेमिसनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने चांगली सुरुवात केली होती, मात्र ते मोठी खेळी करू शकले नाही. १४५ वर ४ गडी गमावल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने रवींद्र जडेजासोबत संघाचा डाव सावरला. अय्यरने ९४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो कसोटी पदार्पणात ५० + धावा करणारा भारताचा ४७ वा खेळाडू बनला. जडेजाने घरच्या मैदानावर ५ डावांत चौथे अर्धशतक ठोकले. दिवसअखेर भारताने ४ बाद २५८ धावा काढल्या. अय्यर आणि जडेजाने पाचव्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी रचली.

भारतीय कर्णधार रहाणेला डीआरएसने वाचवले, परंतु पुढील चेंडूवर त्रिफळाचीत
- ५० वे षटक टाकणाऱ्या जेमिसनच्या पहिल्या चेंडूवर रहाणे विरुद्ध यष्टिरक्षक ब्लंडेलने झेल घेतल्याचे अपील केली. अंपायरने बाद दिले, त्यानंतर रहाणेने डीआरएस घेतला. रिव्ह्यूमध्ये तो नाबाद ठरला. त्याला जीवनदान मिळाले. मात्र, पुढील चेंडूवर जेमिसनने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने ६३ चेंडूत ३५ धावा केल्या.
- पुजारा व रहाणेचा फाॅर्म संघासाठी अडचण : संघातील दोन अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा लयीत नसल्याने संघापुढे अडचण निर्माण झाली आहे. या वर्षी रहाणेने १९ डावांत १९.५८ च्या सरासरीने केवळ ३७२ धावा काढल्या. दुसरीकडे, पुजाराने जानेवारी २०१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर शतक केले नाही. घरच्या मैदानावर खेळलेल्या गत सहा डावांत त्याने केवळ ८६ धावा काढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...