आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-न्यूझीलंड मॅचचे मनोरंजक क्षण:मॅचच्या मध्येच कपलचा रोमान्स, मुख्यमंत्र्यांनीही सीटवरून मारली उडी

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकला. सामन्यादरम्यान अनेक मनोरंजक क्षण आले. काहींना आश्चर्य वाटले तर काही हसले. सर्वात चर्चेचा क्षण म्हणजे रोहित शर्माची घटना. सामन्याचे सर्व नियोजन आणि तयारी करूनही भारतीय क्रिकेटचा कर्णधार शेवटच्या क्षणी काय करायचे याचा त्याला विसर पडला होता.

विषय होता नाणेफेक करण्याची वेळ होती. रवी शास्त्री रायपूरच्या मैदानात होते. टॉस होणार होता. रोहित शर्मा नाणे फेकतो आणि त्यानंतर काय करायचे ते विसरतो. मागे उभे असलेले भारतीय खेळाडू रोहितच्या विसरभोळेपणाचा या क्षणाचा आनंद लुटत राहिले आणि सगळे हसत राहिले.

माजी क्रिकेटपटू श्रीनाथ बॉलिंग करायचा की बॅटिंग, असं विचारत राहिला, रोहित डोकं खाजवून विचार करत राहिला, मग काही सेकंदांनंतर हसत हसत गोंधळलेल्या स्थितीत म्हणाला बॉलिंग करायची.

रोहितने केले टॉस
रोहितने केले टॉस

विराटने रोहितच्या विसराळूपणाबद्दल सांगितले

रोहितला गोंधळेलेल्या स्थितीत पाहून न्यूझीलंडच्या कर्णधारालाही हसू आवरता आले नाही. रोहितच्या मागे उभा असलेला मोहम्मद. शमी, युझवेंद्र चहलसह इतर खेळाडूही खूप हसत होते. आता रोहितच्या विसरण्याची सवयच असल्याची चर्चापण सुरू होती.

चाहते याबाबती असलेली विराट कोहलीची जुनी मुलाखतही शेअर करत आहेत, ज्यामध्ये विराट कोहली म्हणाला होता- “रोहित शर्मा जितका विसरतो, तितका कोणी विसरत नाही. आयपॅड, वॉलेट, घड्याळ, दैनंदिन वापरासारख्या गोष्टी तो अनेकदा विसरतो. त्याने त्याचे सामान सोडल्याचेही त्याला कळत नाही, हॉटेलमध्ये गेल्यावर त्याला आठवते की आयपॅड विमानात राहिला."

बाकीचे खेळाडू मागून हसायला लागले.
बाकीचे खेळाडू मागून हसायला लागले.

रायपूरमध्ये रोहितचे अर्धशतक

शनिवारी खेळवण्यात आलेला सामना हा छत्तीसगडचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. येथे खेळपट्टीवर येताच रोहितला विजयाचा उद्देश आठवला. गोलंदाजांची चमकदार कामगिरी आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 8 गडी राखून जिंकला.

यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 7 वी वनडे मालिका जिंकली आहे. गेल्या चार वर्षांपासून संघाने घरच्या मैदानात वनडे मालिका गमावलेली नाही. तसेच भारताचा वनडेमधला हा सलग सहावा विजय आहे.

विजयानंतर सेलिब्रेशन

रायपूरमधील सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे. रात्री जेव्हा खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा शेफनी टीम इंडियासाठी खास केक तयार केला. या केकमध्ये मैदानावरील गवत, बाऊंड्री, बॅट आणि बॉलची रचना करण्यात आली होती. विराटसह संघातील इतर खेळाडू केक कापताना दिसले, सर्वांनी एकमेकांचे तोंड गोड केले.

भर स्टेडियममध्ये जोडप्याचा रोमान्स

फिल्मी स्टाईलमध्ये केले प्रपोज
फिल्मी स्टाईलमध्ये केले प्रपोज

रायपूरचे क्रिकेट चाहते जरा हटके असेच ठरले. स्टेडियम सुमारे 45 हजार लोकांनी भरले होते. दरम्यान, एका जोडप्याला प्रेमाची अनुभूती आली. ते प्रमीयुगल स्टेडियमच्या वरच्या लेव्हल बाल्कनीच्या काठावर जाऊन मुलाने मुलीचा हात धरला आणि फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसून मुलीला प्रपोज केले.

सामन्यापासून प्रेक्षकांचे क्षणभर लक्ष विचलित झाले. त्यांना पाहून सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्याचे फोटोही मोबाईलमध्ये टिपले. मुलीने हळूच मुलाला हो म्हणताच जमावाने शिट्या वाजवून जल्लोष केला. मुलगा आणि मुलीने एकमेकांना मिठी मारली, त्यानंतर पोलिसांनी येऊन जोडप्याला सीटवर बसण्याची सूचना केली.

जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीटवरून उडी मारली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रायपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्याने छत्तीसगडच्या क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. राज्यातील सर्वसामान्य आणि खास लोक क्रिकेटमध्ये पूर्णपणे मग्न झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल स्वतः त्यांच्या मंत्र्यांसह सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. भारतीय क्रिकेटपटूंनी विजयाचा चौकार लगावला त्यावेळी आनंदाच्या भरात मुख्यमंत्री भूपेश बघेलही पूर्ण उत्साहात आपल्या जागेवरून उठले. अंपायरप्रमाणेच त्यांनी चौकार मारल्याचे संकेत दिले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी टीमला प्रोत्साहन देत विजयाचा जयजयकार केला.

लेझर शो देखील

टीम इंडियाच्या विजयानंतर मैदान अनेक प्रकारच्या दिव्यांनी सजवण्यात आले. स्टेडियममध्ये खरस लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण स्टेडियमवर रंगीबेरंगी दिवे लावण्यात आले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा उत्सव म्हणून हा देखावा तयार करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...