आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या निर्णायक सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर भारताचा T20 कर्णधार हार्दिक पंड्याने पृथ्वी शॉला T20 मालिकेची ट्रॉफी सुपूर्द केली. मात्र, पृथ्वी शॉला T20I मालिकेत एकही सामना खेळवलेले नाही. पृथ्वी शॉ जुलै 2021 मध्ये शेवटचा T20I सामना खेळला होता. तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, गिल चांगली कामगिरी करत असल्याने शॉला संधीची वाट पाहावी लागेल.
तिसरा T20 भारताने 168 धावांनी जिंकला
टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. अहमदाबाद येथे झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुभमन गिलच्या (नाबाद 126) या फॉरमॅटमधील पहिल्या शतकामुळे भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ 12.1 षटकांत 66 धावांत सर्वबाद झाला. हार्दिक पंड्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. पंड्याने ब्लेअर टिकनर एक धाव, लोकी फर्ग्युसन शून्य, ग्लेन फिलिप्स 2 धावा आणि फिन ऍलनचे 3 धावात बळी घेतले.
पृथ्वीने रणजीमध्ये त्रिशतक झळकावले होते
पृथ्वी शॉने गेल्या महिन्यात गुवाहाटी येथे मुंबई आणि आसाम यांच्यातील रणजी ट्रॉफी फेरी-5 सामन्यात त्रिशतक झळकावले होते. त्याने 326 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. 379 धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने 49 चौकार आणि 4 षटकार मारले होते.
पृथ्वीची धावसंख्याही रणजी ट्रॉफीतील सलामीवीराची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने त्रिपुराच्या समित गोहेलचा विक्रम मोडला. गोहेलने 2016 मध्ये 359 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.