आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs New Zealand T20 LIVE Score Updates: KL Rahul Rohit Sharma | IND Vs NZ 1st Twenty Jaipur Stadium Cricket News

भारत Vs न्यूझीलंड पहिला टी-20 सामना:रोहित-राहुल युगाची विजयाने सुरुवात, रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडवर 5 विकेट्सनी मात

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 5 विकेट्स राखून पराभव करत रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना न्यूझीलंडने 6 गडी गमावून 164 धावा केल्या. मार्टिन गप्टिल (70) आणि मार्क चॅपमन (63) यांनी धावांची खेळी केली. भारताकडून आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार प्रत्येकी 2 बळी घेण्यात यशस्वी ठरले. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

165 धावांचे लक्ष्य रोहित आणि कंपनीने 19.4 षटकांत केवळ 5 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 19 नोव्हेंबरला रांची येथे होणार आहे.तिसऱ्या षटकात रोहितने साऊथीच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी 31 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. या जोडीला ब्रेक मिचेल सँटनरने राहुलला (15) बाद करून दिला. दुसऱ्या विकेटसाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पुन्हा संघर्ष करावा लागला. रोहित आणि सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 59 धावा जोडल्या. ही भागीदारी बोल्टने रोहितची (48) विकेट घेत तोडली. न्यूझीलंडची तिसरी विकेटही बोल्टच्या खात्यात आली. त्याने सूर्यकुमार यादवला (62) बोल्ड केले. टीम साऊदीने श्रेयस अय्यरची (5) विकेट घेतली. अखेरच्या षटकात व्यंकटेश अय्यरला (4) डॅरिल मिशेलने बाद केले.

गप्टिल-चॅपमन यांनी शानदार खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या किवी संघाची सुरुवात खराब झाली आणि डावाच्या तिसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने डॅरिल मिशेलला गोल्डन डकवर बाद केले. मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 चेंडूत 109 धावांची भागीदारी करत संघाला पुन्हा रुळावर आणले.

  • पॉवरप्लेपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या 1 गडी गमावून 41 धावा होती.

आयपीएल फेज-2 मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व्यंकटेश अय्यरला आज टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. अय्यर हा बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत तज्ज्ञ आहे आणि तो सामन्यात हार्दिक पांड्याची कमतरता भरून काढू शकतो. फेज-2 मध्ये त्याने 10 सामन्यात 370 धावा केल्या आणि 3 बळी घेतले आहे.

दोन्ही संघ-

IND - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज

NZ - मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

व्यंकटेश अय्यरला आज टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी.
व्यंकटेश अय्यरला आज टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी.

चाहते स्टेडियमवर पोहोचले
या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन स्टेडियममध्ये चाहत्यांची एन्ट्री सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...