आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs New Zealand T20 LIVE Score Updates: KL Rahul Rohit Sharma | IND Vs NZ 2nd Twenty Ranchi JSCA Stadium Cricket News

IND vs NZ 2nd T-20I:रोहित-राहुलच्या सुपरहिट जोडीने घातला धुमाकूळ, न्यूझीलंडचा 7 विकेटने पराभव करत जिंकली मालिका

रांची16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना किवी संघाने 6 गडी गमावून 153 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने (34) सर्वाधिक धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हर्षल पटेलने 2 बळी घेतले. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

154 धावांचे लक्ष्य रोहित अँड कंपनीने 17.2 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठले. केएल राहुल (65) आणि कर्णधार रोहित शर्मा (55) यांनी शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारत सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असून मालिकेतील शेवटचा सामना 21 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.

रोहितने 450 षटकार पूर्ण केले
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात 1 षटकार मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 षटकार पूर्ण केले. ख्रिस गेल (553) आणि शाहिद आफ्रिदी (476) नंतर, हिटमॅन हा मोठा विक्रम करणारा जगातील तिसरा आणि भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली. मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी पहिल्या विकेटसाठी 30 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली. दीप चहरने गुप्टिलला (31) बाद करून ही भागीदारी तोडली. भारताला दुसरे यश अक्षर पटेलने मार्क चॅपमनला (21) बाद करून मिळवून दिले. डेब्यू करणाऱ्या हर्षल पटेलने डॅरिल मिशेलला (31) बाद करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला बळी घेतला. टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी चौथ्या विकेटसाठी 23 चेंडूत 35 धावा जोडून संघाला पुन्हा रुळावर आणले, मात्र ही भागीदारी आर अश्विनने सेफर्टची (13) विकेट घेत तोडली. न्यूझीलंडची 5वी विकेट ग्लेन फिलिप्स (34) च्या रूपात पडली.

गुप्टिलने कोहलीला मागे टाकले

विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (3227) धावा केल्या आहेत आणि मार्टिन गुप्टिलने सर्वाधिक धावांच्या बाबतीत त्याला मागे टाकले आहे. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

संघात बदल
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी आयपीएल फेज-2 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर किवी संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. टीमने रचिन रवींद्र, टॉड अॅस्टल आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या जागी जेम्स नीशम, अॅडम मिलने आणि ईश सोधीला स्थान दिले आहे.

दोन्ही संघ:
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल.

न्यूझीलंड - मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), जेम्स नीशम, इश सोधी, मिचेल सँटनर, टिम साउथी (क), अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.

चाहते स्टेडियमवर पोहोचले
या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन चाहते स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. सामन्यात फक्त अशाच चाहत्यांना प्रवेश मिळाला आहे, ज्यांच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे.

भारतीय ध्वजासह टीम इंडियाचा छोटा चाहता
भारतीय ध्वजासह टीम इंडियाचा छोटा चाहता
बातम्या आणखी आहेत...