आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs New Zealand WTC Final 3rd Day LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Kane Williamson | NZ Vs IND Test Championship Final Latest News Photo Update

WTC फायनलमध्ये ज्याची भीती तेच घडले:​​​​​​​कोहली व रहाणेच्या लवकर बाद झाल्याने भारताचा डाव झाला समाप्त, कीवी गोलंदाजांनी केला स्विंगचा कहर

साऊथॅम्प्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट आणि रहाणे लवकर बाद झाल्याने संघाला मोठे नुकसान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशीच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 217 धावांवर समाप्त झाला. कोहली व रहाणे लवकर बाद झाल्याने भारतीय संघाची ही स्थिती पाहायला मिळाली. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने दोन गडी गमावून 101 धावा केल्या. आता न्यूझीलंड संघाची बाजू चांगली आहे. यावर अनुभवी कॉमेंटेटर पद्मश्री सुशील दोषी म्हणतात की, हा सामना सध्या बराबरीत असून भारतीय गोलंदाजांना चौथ्या दिवसाच्या सामन्यात लवकरात लवकर गडी बाद करावे लागतील.

विराट आणि रहाणे लवकर बाद झाल्याने संघाला मोठे नुकसान
सुशील दोषी म्हणाले की, खेळाच्या सुरुवातीला ज्याची भीती होती तेच घडले. दोषी यांनी दुसऱ्या दिवशीच्या सामन्याच्या अॅनालिसिसमध्ये सांगितले होते की, जर विराट कोहली आणि रहाणे यांनी चांगली भागेदारी केली नाही तर संघाचा डाव लवकरात लवकर कोसळेल. अगदी तसेच झाले. विराट कोहलीने दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात त्यांच्या आकडेवारीत एका धावांचीही भर घातली नाही. तर दुसरीकडे राहणे 49 धावा करुन बाद झाला.

स्कोअर कार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

कित्येक वर्षांनी पाहिली अशी नियंत्रित स्विंग गोलंदाजी
दोषी पुढे म्हणाले की, कीवी गोलंदांजानी ज्या प्रकारे नियंत्रित स्विंगचे प्रदर्शन केले ते मी बऱ्याच वर्षांनंतर पाहत आहे. त्यांनी काइल जेमसनच्या 6 फूट 8 इंच उंचीला भारतीय फलंदाजांच्या अडचणीचे कारण मानले. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी ज्या पद्धतीने चेंडूला स्विंग केले तसे भारतीय गोलंदाजांला करता आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय शतकांमध्ये कोहली तिसऱ्या स्थानावर, पोंटिंगची बरोबरी करण्याची होती संधी
एकूणच आंतरराष्ट्रीय शतकांबद्दल जर आपण बोललो तर त्यात कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 436 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 70 शतके ठोकली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर पोंटिंगने 560 सामन्यात 71 शतके केली आहेत. सचिन तेंडुलकर 664 सामन्यांत 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

दोन्ही संघ
भारत :
विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड: केन विलियम्सन (कप्तान), टॉम लाथम, डेवॉन कोनवे, रॉस टेलर, हेनरी निकोल्स, बीजे वाटलिंग, कोलिन डि ग्रँडहोम, काइल जेमिसन, टिम साउदी, नील वॅगनर आणि ट्रेंट बोल्ट.

बातम्या आणखी आहेत...