आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs New Zealand WTC Final LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Kane Williamson | NZ Vs IND Test Championship Final Latest News Photo Update

WTC फायनलचा दुसरा दिवस:2007 नंतर टीम इंडियाच्या सलामीवीरांनी इंग्लंडच्या मैदानावर खेळली 20+ षटके

साऊथॅम्प्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राेहित-शुभमान गिलची टीम इंडियाला अर्धशतकी भागीदारीची सलामी
  • दिवसअखेर भारत 3 बाद 146 धावा; काेहली-रहाणे मैदानावर

राेहित शर्मा (३४) अाणि शुभमान गिलने (२८) शनिवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर ६४.४ षटकांत ३ बाद १४६ धावा काढल्या. काेहली (४४) व रहाणे (२९) मैदानावर कायम अाहे. टीम इंडियाच्या सलामीवीरांनी २००७ नंतर पहिल्यांदाच २० पेक्षा अधिक षटके खेळली अाहे. २०११ पासून २०२० दरम्यान टीम इंडियाच्या काेेणत्याही सलामीवीरांना अाशिया खंडाबाहेर २० पेक्षा अधिक षटके खेळता अाली नाहीत. अाता सलामीच्या राेहित व शुभमानने इंग्लंडमध्ये २० षटके खेळत पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली. २००७ मध्ये कार्तिक अाणि जाफरने इंग्लंडमध्ये २०+ षटके खेळली हाेती. अाता न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. अाता न्यूझीलंड टीमकडून कायले जेमीसन, ट्रेट बाेल्ट अाणि नील वॅगनरने प्रत्येकी एक विकेट घेतली अाहे.

पुजाराची लक्षवेधी खेळी
चेतेश्वर पुजाराची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने ३५ डाॅट बाॅल खेळली. त्यानंतर ३६ व्या चेंडूवर चाैकार मारला. ८ धावांवर पुजाराला बाेल्टने बाद केले. बाेल्टने कसाेटीत चाैथ्यांदा पुजाराला बाद केले.

काेहलीच्या कसाेटीत ७५०० धावा पूर्ण
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली ४४ धावांवर नाबाद असून कसाेटी करिअरमध्ये त्याने ७५०० धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे जगातील ४२ वा तर भारताचा सहावा फलंदाज ठरला.

दोन्ही टीम
भारत :
विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड: केन विलियम्सन (कप्तान), टॉम लाथम, डेवॉन कोनवे, रॉस टेलर, हेनरी निकोल्स, बीजे वाटलिंग, कोलिन डि ग्रँडहोम, काइल जेमिसन, टिम साउदी, नील वॅगनर आणि ट्रेंट बोल्ट.

बातम्या आणखी आहेत...