आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs New Zealand WTC Final News & Updates, IND Vs NZ Test Records Southampton Pitch Report & Weather Forecast; News And Live Updates

रेकॉर्डमध्ये न्यूझीलंड वरचढ:आजपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल; प्रक्षेपण दु. 3.00 वाजेपासून

साउदम्प्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत 18 वर्षांपासून आयसीसी इव्हेंटमध्ये अपयशी; इंग्लंडमध्ये किवींविरुद्ध फ्लॉप शो
  • भारतीय संघ पहिल्यांदा कसोटीमध्ये पाच गोलंदाजांसह मैदानावर!

कसाेटीच्या इतिहासातील सर्वात माेठ्या अाणि चित्तथरारक लढतीला अाज शुक्रवारपासून इंग्लंडच्या राेझ बाऊल स्टेडियमवर सुरुवात हाेणार अाहे. भारत अाणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही चॅम्पियनशिप जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार अाहे. अातापर्यंतच्या निराशाजनक खेळीतून सावरत आयसीसीच्या या इव्हेंटमध्ये चॅम्पियन हाेण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे.

मात्र, यासाठीची टीम इंडियाची वाट अधिक खडतर मानली जाते. कारण, अातापर्यंत टीमला आयसीसीच्या इव्हेंटमध्ये यशस्वी अशी लक्षवेधी कामगिरी करता अाली नाही. टीम इंडियाचा अशा इव्हेंटमध्ये फ्लॉप शाे ठरला अाहे. दुसरीकडे यजमान इंग्लंड संघाविरुद्ध कसाेटी मालिका विजयाने न्यूझीलंड टीम फाॅर्मात अाहे. अाता हीच लय कायम ठेवताना चॅम्पियनशिप जिंकण्याचा टीमचा मानस अाहे. अातापर्यंतच्या कामगिरीनुसार या ठिकाणी न्यूझीलंड संघ वरचढ ठरलेला अाहे.

मालिका विजयाने न्यूझीलंडचा अात्मविश्वास द्विगुणित
कसाेटी चॅम्पियनशिप फायनलसाठी न्यूझीलंड टीमने प्रचंड मेहनत घेतली अाहे. या टीमने याच्या तयारीसाठी अायाेजित कसाेटी मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने यजमान इंग्लंड संघाविरुद्धची दाेन कसाेटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. या मालिका विजयातून न्यूझीलंडच्या खेळाडूंचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. लक्षवेधी खेळीतून डेवाॅनने अापले सलामीचे स्थान निश्चित केले. तसेच मधल्या फळीत विल्यम्सन व टेलरसारखे अनुभवी फलंदाज सज्ज झालेले अाहेत. यष्टिरक्षक वाॅल्टटिंगची ही शेवटची कसाेटी अाहे.

न्यूझीलंड संघ एकदाच अायसीसीच्या ट्राॅफीचा मानकरी; फायनलमध्ये टीम इंडियावरच मिळवला हाेता विजय
न्यूझीलंडने अातापर्यंतच्या अापल्या करिअरमध्ये एकदाच अायसीसीच्या ट्राॅफीवर नाव काेरण्याचा बहुमान पटकावला अाहे. हा संघ २००० मध्ये अायसीसीच्या चॅम्पियन्स ट्राॅफीचा मानकरी ठरला हाेता. न्यूझीलंड टीमने फायनलमध्ये भारतावर मात करून हा पहिला किताब जिंकला. यादरम्यान ४ गड्यांनी न्यूझीलंडने फायनल जिंकली हाेती. भारताला २००३ पासून न्यूझीलंड संंघाविरुद्ध अायसीसीच्या इव्हेंटमध्ये विजय संपादन करता अालेला नाही. १९७५ पासून भारताने इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला नाही.

प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा , शुभमान गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) रहाणे, पंत (विकेटकीपर), जडेजा, अश्विन, इशांत, शमी, बुमराह.

बातम्या आणखी आहेत...