आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. BCCI आणि PCB यांच्यातील या मतभेदानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघ 2013 च्या वनडे विश्वचषकातून माघार घेण्याच्या तयारीत आहे.
भारतीय क्रिकेटकडून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भारताने आशिया चषक 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर पाकिस्तानची अवस्था वाईट झाली आहे आणि आता 2023 मध्ये वनडे विश्वचषक न खेळण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, आशिया चषकासाठी पाकिस्तानला न जाण्याच्या BCCI च्या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खूपच नाराज आहे. जर आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित केला गेला तरच टीम इंडियाच त्यात सहभागी होईल, असे BCCI ने स्पष्ट केले आहे.
भारताने स्पष्ट केले आहे की विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलसारखे खेळाडू जर स्पर्धेत खेळत नसतील तर प्रायोजक स्वतःहून माघार घेतील. त्यामुळे खेळाडू पाकिस्तानात जाणार नाहीत
आशिया चषक शिफ्ट होईल
रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर आशिया कप 2023 पाकिस्तानच्या बाहेर हलवला गेला तर पाकिस्तान हा भारतात होणार्या वनडे विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होणार नाही. भारताच्या विरोधानंतर आशिया चषक UAE मध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने BCCI चा निर्णय
विशेष म्हणजे BCCI चे सचिव जय शाह यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने BCCI असा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध फार दिवसांपासून चांगले नाहीत. दोन्ही संघ फक्त ICC स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. अलीकडेच 2022 साली झालेल्या T-20 विश्वचषकात भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, तेव्हा टीम इंडियाने बाजी मारली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.