आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे वर्ल्ड कप 2023:15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्याची शक्यता, BCCI ला अहमदाबादेत हवा आहे सामना, पाक तयार नाही

दुबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला सामना होणार आहे. आयसीसीने अद्याप विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. या विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे.

क्रिकेट वेबसाइट क्रिक बझच्या रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला होऊ शकतो. मात्र, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये सामन्याच्या मैदानावर एकमत झालेले नाही. हा सामना अहमदाबादमध्ये व्हावा अशी बीसीसीआय आणि आयसीसीची इच्छा आहे, पण पीसीबी त्यासाठी तयार नाही.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना, भारताची ऑस्ट्रेलियाशी होणार पहिली लढत

रिपोर्टनुसार, वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. गेल्या विश्वचषकात इंग्लंड विजेता होता आणि न्यूझीलंड उपविजेता होता.

भारत आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये खेळू शकतो. त्याची तारीख अजून आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना 15 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी होऊ शकतो. याच दिवशी पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमचाही वाढदिवस आहे. जेतेपदाचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

भारतातील 12 स्टेडियम्सची विश्वचषकासाठी निवड

विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो आणि यासाठी 12 ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये चेन्नई आणि कोलकाताचाही समावेश आहे. उर्वरित 10 ठिकाणे अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, राजकोट, बंगळुरू, दिल्ली, इंदूर, गुवाहाटी, हैदराबाद आणि धर्मशाला आहेत.

पाकिस्तान आशिया चषक यूएईमध्ये हलवण्यास तयार: ACC सहमत नसल्यास PAK संघ स्पर्धेतून माघार घेऊ शकतो

पाकिस्तानने आशिया चषकासाठी नवा प्रस्ताव आशिया क्रिकेट परिषदेकडे (ACC) पाठवला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी म्हणाले की जर एसीसी सदस्य भारताचे सामने इतर देशांमध्ये आयोजित करण्यास तयार नसतील तर आम्ही यूएईमध्ये स्पर्धेचे आयोजन करू शकतो. म्हणजेच पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर होऊ शकतो. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

दक्षिण आफ्रिका पात्रता मिळवणारा आठवा संघ ठरला
भारतात खेळल्या जाणार्‍या वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरणारा दक्षिण आफ्रिका आठवा संघ ठरला आहे. चार वर्षे जुन्या ICC सुपर लीगच्या (जुलै 2020-मे 2023) गुणतालिकेत आठव्या स्थानावर आफ्रिकन संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

13 संघ सुपर लीगमध्ये, 8 पात्र ठरले
2020 ते मे 2023 या कालावधीत भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, अफगाणिस्तान, आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज या 13 देशांनी सुपर लीगमध्ये सामने खेळले. यापैकी 8 संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.