आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Shi Lanka Cricket Match | Marathi News | India Sri Lanka Team India's Series Win; Overcome Sri Lanka By 7 Wickets

रोहितचे विश्वविक्रमी नेतृत्व:भारत श्रीलंका टीम इंडियाचा मालिका विजय; श्रीलंकेवर 7 गड्यांनी मात

धर्मशाला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरच्या मैदानावर सर्वाधिक 16 सामने जिंकण्याचा पराक्रम
  • विजयाची टक्केवारी कोहली व धोनीपेक्षा अधिक

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाचा विश्वविक्रम नाेंदवला गेला. त्याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला घरच्या मैदानावर विक्रमी सर्वाधिक १६ विजय मिळवून दिले. यासह ताे यजमान टीमला घरच्या मैदानावर सर्वाधिक विजय मिळवून देणारा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. यजमान भारतीय संघाने शनिवारी श्रीलंका टीमवर मालिका विजय मिळवला. टीम इंडियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला ७ गड्यांनी धूळ चारली. यासह भारतीय संघाला तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेता आली.

आता मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना आज रविवारी धर्मशालाच्या मैदानावर रंगणार आहे. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८३ धावा काढल्या. सामनावीर श्रेयस अय्यर (नाबाद ७४) व रवींद्र जडेजा (नाबाद ४५) यांनी झंझावाती खेळीतून १७.१ षटकांत भारताचा सात गड्यांनी विजय निश्चित केला. संघाच्या विजयात संजू सॅमसनने ३९ धावांचे योगदान दिले. दरम्यान, श्रेयसने नाबाद ७४ धावांची खेळी केली. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग ११ टी-२० सामने जिंकले आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताचा हा सलग चाैथा मालिका विजय नोंद झाला.

बातम्या आणखी आहेत...