आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्णधार रोहित शर्मा आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आठवडाभरात टी-२० फॉरमॅटमध्ये सलग दुसरा मालिका विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया आज शनिवारी धर्मशालाच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळणार आहे. सलामीच्या विजयासह टीम इंडियाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
आता श्रीलंका टीमसाठी दुसरा टी-२० सामना हा निर्णायक आहे. टीम इंडियाने तीन दिवसांपूर्वी पाहुण्या विंडीजविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने आपल्या नावे केली. यातून आता रोहित शर्माला नेतृत्वात घरच्या मैदानावर भारताला दहा दिवसांत सलग दुसरा टी-२० मालिका विजय मिळवून देणारा जगातील यशस्वी कर्णधार हाेण्याची संधी आहे. तसेच ताे इंग्लंडच्या कर्णधार मॉर्गन व न्यूझीलंडच्या विलियम्सनला मागे टाकेल.
रोहित-काेच द्रविडचा वर्ल्डकपवर फोकस; युवांना सर्वाधिक संधी; पुण्याचा ऋतुराज येणार सलामीला!
गतवर्षी टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे टीमचे किताबाचे स्वप्न भंगले. मात्र, आता सर्वाेत्तम कामगिरीतून विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. नवनियुक्त कर्णधार राेहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आता आगामी विश्वचषकावर फोकस केला आहे. यासाठी युवा खेळाडूंना सर्वाधिक संधी देण्यावर भर दिला जात आहे. आता पुण्याच्या ऋतुराजही सलामीची संधी मिळू शकेल. यातून विश्वचषकासाठी युवा शिलेदार मिळतील, असा विश्वास काेचला आहे. सध्या टीममधील युवा खेळाडू आपल्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये सातत्य ठेवत स्वत:ला सिद्ध करत आहेत.
जडेजाला मोठी संधी; कॅप्टन रोहितचा प्रयाेग
आता आगामी दाेन्ही टी-२० सामन्यांदरम्यान कर्णधार राेहित शर्मा नवा प्रयाेग साकारण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने रवींद्र जडेजाच्या फलंदाजी क्रमांकात बदल करण्याचा निर्णय घेतला. यातून जडेजाला आता आघाडीला फलंदाजीची संधी मिळू शकेल. यावर भर देण्यासाठी संघ व्यवस्थापनानेही पुढाकार घेतला. तसेच दमदार पुनरागमन करणाऱ्या सॅमसनचेही संघातील स्थान कायम राहण्याचे चित्र आहे. त्याला सलामीला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.