आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया ऐतिहासिक मालिका विजयाने यंदाच्या हंगामाला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. सलामीच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या भारतीय संघासाठी आफ्रिकेच्या मैदानावर मालिका विजय ही एेतिहासिक कामगिरी ठरणार आहे. भारताला अद्याप या देशात कसाेटी फाॅरमॅटमध्ये मालिका विजय संपादन करता आला नाही. टीम हीच माेहिम फत्ते करण्यासाठी आफ्रिकेच्या मैदानावर उतरणार आहे. भारत व यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसाेटी सामन्याला आज साेमवारपासून सुरुवात हाेत आहे. भारताने या तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सलामीच्या कसाेटीत टीम इंडियाने ११३ धावांनी यजमान संघाला धूळ चारली हाेती. त्यामुळे टीमची नजर आता आफ्रिकेतील पहिल्या कसाेटी मालिका विजयाकडे लागली आहे. यातूनच मालिका विजयाचा नवा अध्याय नव्या वर्षात रचण्याचा टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीचा मानस आहे.
काेच द्रविडला पुजारा, काेहलीकडून माेठ्या खेळीची अपेक्षा
सलामीच्या कसाेटीत सलामीवीर जाेडीने भारताला जाेडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. या फळीतील फलंदाजांना अर्धशतकी खेळी करता आली नाही. काेच राहुल द्रविडला आता चेतेश्वर पुजारासह विराट काेहली आणि रहाणेकडून माेठ्या खेळीची आशा आहे. शतकी खेळी पुजाराने ३६ महिन्यांनंतर, काेहलीने २६ महिन्यांनंतर आणि अजिंक्य रहाणेने १२ महिन्यांनंतर केली आहे.
जान्सेनला वनडे मालिकेसाठी संधी; आफ्रिका संघाची घाेषणा
भारतविरुद्ध वनडे मालिकेसाठी गाेलंदाज जान्सेनला आफ्रिका संघात संधी मिळाली. या मालिकेसाठी रविवारी आफ्रिकेचा संघ जाहीर झाला. संघात बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), जुबेर हमजा, मार्को जान्सेन, मलान, सिसंडा मगाला, एडन, डेव्हिड मिलर, एनगिडी, पार्नेल, एंडिले फेहलुवायो, प्रिटोरियस, कगिसो रबाडा, शम्सी, रेसी वान डेर डुसेन, काइल वेरेनचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.