आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियासाठी आता पहिल्यांदाच आफ्रिकेच्या मैदानावर कसाेटीत मालिका विजयाची एेतिहासिक कामगिरी करण्याची शेवटची संधी आहे. भारतीय संघ याच माेहिमेला फत्ते करण्याच्या इराद्याने केपटाऊनच्या मैदानावर उतरणार आहे. मंगळवारपासून भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या निर्णायक कसाेटी सामन्याला सुरुवात हाेणार आहे. केपटाऊनच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे आता केपटाऊनच्या मैदानावरील कसाेटी ही दाेन्ही टीमसाठी निर्णायक आहे.भारतीय संघाची नजर आता पहिल्यांदा आफ्रिकेत कसाेटी मालिका जिंकण्यावर लागली आहे.
टीमला आतापर्यंत आफ्रिका दाैऱ्यात कसाेटीत मालिका विजय संपादन करता आलेला नाही. त्यामुळे याच एेतिहासिक विजयाला गवसणी घालण्याचा कर्णधार काेहलीचा मानस आहे. भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर सलामीच्या कसाेटी सामन्यात यजमान आफ्रिकेवर ११३ धावांनी मात केली हाेती. त्यानंतर यजमान आफ्रिकेने दुसऱ्या कसाेटीत दमदार पुनरागमन करताना टीम इंडियावर सात गड्यांनी मात केली.विराट काेहली फिट; तिसऱ्या कसाेटीत खेळणार :पाठीच्या दुुखापतीतून सावरलेला कर्णधार विराट काेहली आता पूर्णपर्ण फिट झाला आहे. त्यामुळे त्याचा तिसऱ्या कसाेटीतील सहभाग निश्चित मानला जाताे. यासाठी त्याने संघातील खेळाडूंसाेबत दाेन दिवस कसून सरावही केला. त्यामुळे आता फिट असलेल्या काेहलीला सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे.
भारत केपटाऊनमध्ये पहिल्या विजयासाठी सज्ज
भारतीय संघाला आफ्रिका दाैऱ्यात आतापर्यंत केपटाऊनच्या मैदानावर विजय संपादन करता आला नाही. आता याच मैदानावर एेतिहासिक मालिका विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. टीमने आतापर्यंत या मैदानावर पाच कसाेटी सामने खेळले. यातील तीन कसाेटीत टीम इंडियाचा पराभव झाला. तसेच दाेन कसाेटी सामने ड्राॅ झाले. त्यामुळे आता या मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे.
जायबंदी सिराजला विश्रांती, ईशांत वा उमेश यांच्यातील एकाची निवड
दुसऱ्या कसाेटीत टीम इंडियाला सुमार गाेलंदाजीचा माेठा फटका बसला. तसेच टीमचा युवा गाेलंदाज सिराज हा या कसाेटीदरम्यान जायबंदी झाला. त्यामुळे आता त्याला विश्रांती दिली जाणार आहे. त्याच्या जागी तिसऱ्या कसाेटीसाठी संघात ईशांत शर्मा वा उमेश यादव यांच्यापैकी एकाची निवड हाेईल. त्यामुळे या दाेघांमधील एकाच्या निवडीवर सर्वांची नजर आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.