आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs South Africa India India's Historic Test Win Against South Africa In Centurion Virat Kohli Rahul Dravid Dance Video Goes Viral

सेंच्युरियनमधील विजयाचा उत्सव:राहुल द्रविड आणि विराट कोहलीने ऐतिहासिक विजयानंतर केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा कसोटीतील हा पहिला विजय आहे. सेंच्युरियन हा द्रविडच्या कसोटी कारकिर्दीतील टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून पहिला सामना होता.

प्रशिक्षक द्रविड आणि कॅप्टन कोहली यांच्यासाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे, हे हॉटेल कर्मचाऱ्यांसोबतच्या त्यांच्या डान्सवरुन कळू शकते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरने द्रविडच्या डान्सवर कॉमेंट केली आहे की, कर्णधार आणि कोचला एकत्र नाचताना पाहणे चांगले वाटत आहे.

अश्विन, पुजारा आणि सिराजचा डान्स व्हिडिओही व्हायरल
याआधी आर अश्विन आणि चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद सिराज यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये सिराज आणि अश्विन दोघेही डान्स करून पुजाराला डान्स करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आर अश्विनने विजयानंतर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता आणि लिहिले होते की, 'मॅचनंतरचे फोटो पोस्ट करण्याची परंपरा खूप कंटाळवाणी झाली आहे, त्यामुळे पुजाराने ठरवले की तो पहिल्यांदाच डान्स करून तो संस्मरणीय बनवणार आहे. सोबतच मोहम्मद सिराज आणि आपला अश्विन... शानदार विजय.'

भारताने पाकिस्तानला टाकले मागे
भारताचा हा या वर्षातील 8वा विजय आहे. यासोबतच टीम इंडिया यावर्षी सर्वाधिक कसोटी जिंकणारा संघ बनला आहे. या कसोटीपूर्वी भारत-पाकिस्तान 7-7 सामने जिंकून बरोबरीत होते. इंग्लंडच्या नावावर चार विजय आहेत.

बातम्या आणखी आहेत...