आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Vs South Africa India Won The Toss And Bowled; Chances For Pant Arshdeep Deepak And Ashwin; Bumrah Out

पहिला टी-20 सामना भारताने जिंकला:दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून मात; मालिकेत 1-0 ने आघाडी, राहुल, सूर्यकुमारची फिफ्टी

तिरुअनंतपुरम2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुअनंतपुरम येथे झालेला पहिला टी-20 सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाला अवघ्या 14 धावांत 5 धक्के बसले. त्यानंतर हा संघ सावरलाच नाही. 20 षटकात दक्षिण आफ्रिकेने 106/8 अशी धावसंख्या उभारत भारतासमोर 107 धावांचे आव्हान विजयासाठी दिले. हे आव्हान भारतीय फलंदाजांनी 16.4 षटकात पार केले.

सूर्यकुमार, राहुल चमकले

धावांचा पाठलाग करताना भारताचीही खडतर सुरुवात झाली. परंतु, फलंदाज के. एल. राहुलने 56 चेंडूत 51 धावा आणि सुर्यकुमार यादवने 33 चेंडूत 50 धावांची अत्यंत संयमी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारपाठोपाठ के. एल. राहुलने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देत आपले अर्धशतकही साजरे केले. तर दक्षिण आफ्रिकेतर्फे एनरिक नॉर्तजे आणि कगिसो रबाडा यांना प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळाल्या.

कर्णधार रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सहकारी खेळाडूसोबतआनंद व्यक्त करताना रबाडा.
कर्णधार रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सहकारी खेळाडूसोबतआनंद व्यक्त करताना रबाडा.

महाराजने दिला एकतर्फी लढा

दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज हा फलंदाजच खेळपट्टीवर टीकाव धरू शकला. त्याने 35 चेंडूत 41 धावा काढल्या. त्यानंतर हर्षल पटेलच्या घातक चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला. दिपक चहरने 2 तर अर्शदीपने 3 बळी घेतले. तसेच हर्षल पटेलने 2 तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांचा दरारा

 • आफ्रिकन संघाच्या पहिल्याच षटकात पहिली विकेट पडली. दीपक चहरने आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केले.
 • अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात तीन बळी घेतले.
 • प्रथम त्याने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला बोल्ड केले.
 • यानंतर, षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने रिले रुसोला पंतच्या हाती विकेटच्या मागे झेलबाद केले.
 • या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने तिसरी विकेट घेतली. आतल्या चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरला बोल्ड केले.
 • दीपक चहरने पाचवी विकेट घेतली. त्याने त्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकडे झेलबाद केले.
 • दक्षिण आफ्रिकेचे चार फलंदाज बावुमा, रुसो, मिलर आणि स्टब्स यांना खातेही उघडता आले नाही.
 • हर्षल पटेलने दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का दिला. त्याने एडन मार्करामला 17 धावांवर LBW बाद केले.
 • अक्षर पटेलने आफ्रिकेची सातवी विकेट घेतली. त्याने 24 धावा करून पारनेलला मिड-विकेटवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

संघात झाले चार बदल

भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चहरला संधी मिळाली आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला आहे. युझवेंद्र चहलच्या जागी आर.अश्विन आणि अर्शदीप सिंगचेही पुनरागमन झाले आहे.

बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

जसप्रीत बुमराहने मंगळवारी भारताच्या सराव सत्रादरम्यान पाठदुखीची तक्रार केली. त्यानंतर वैद्यकीय संघाच्या आदेशानुसार तो पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. विश्वचषक पाहता भारतीय संघ व्यवस्थापन कोणतीही मोठी जोखीम पत्करू इच्छित नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, दीपक चहर, आर. अश्विन आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (क), रिले रुसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, तबरीझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या, केशव महाराज.

ही मालिका भारतासाठी अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भूमीवर कधीही टी-20 मालिका जिंकलेली नाही.

2015 मध्ये दोन्ही संघांमध्ये प्रथमच क्रिकेट मालिकेतील सर्वात लहान स्वरूपाची मालिका खेळली गेली आणि त्यात टीम इंडियाला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, यानंतर 2019 मध्ये टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. त्याचवेळी 2022 मध्ये झालेली मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. म्हणजेच गेल्या 7 वर्षात दोन्ही संघांमध्ये भारतात 3 T20 मालिका झाल्या आणि त्यात एकदाही टीम इंडिया जिंकू शकली नाही.

तिरुवनंतपुरममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचेही एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे.
तिरुवनंतपुरममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचेही एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने आठ सामने जिंकले. एका सामन्यात निकाल लागला नाही. उभय संघांमधील चार महिन्यांतील ही दुसरी टी-20 मालिका आहे. या वर्षी जूनमध्ये आफ्रिकन संघ पाच सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. एका सामन्यात निकाल लागला नाही.

बातम्या आणखी आहेत...