आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने (७९) दमदार पुनरागमन करताना मंगळवारी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. मात्र, त्याचे हे कसाेटीतील सर्वात संथ दुसरे अर्धशतक ठरले. आता त्याने १५८ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. पाहुण्या टीम इंडियाने पहिल्या डावात २२३ धावा काढल्या. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या कागिसाे रबाडा (४/७३) आणि मार्काे जान्सेनने (३/५५) शानदार गाेलंदाजीतून टीम इंडियाचा पहिला डाव झटपट गुंडाळला. भारतीय संघाकडून पुन्हा एकदा अजिंक्य रहाणे (९) अपयशी ठरला. दरम्यान चेतेश्वर पुजाराने ४३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १७ धावा काढल्या. अद्याप २०६ धावांनी पिछाडीवर असलेल्या आफ्रिका संघाचा मार्कराम (८) आणि केशव महाराज (६) मैदानावर आहेत. भारताकडून बुमराहने १ बळी घेतला.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर फलंदाज लाेकेश राहुल (१२) आणि मयंक अग्रवाल (१५) झटपट बाद झाले. त्यामुळे भारताने ३३ धावांसाठी दाेन गडी गमावले.
काेहलीचे पाच डावांनंतर कसाेटी अर्धशतक साजरे;राहुल द्रविड मागे
कर्णधार विराट काेहलीने पाच डावांनंतर कसाेटी अर्धशतक साजरे केले. त्याने तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ७९ धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत हे यश संपादन केले. तसेच त्याच्या नावे दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर कसाेटीत सर्वाधिक ६९० धावा काढण्याचा पराक्रम नाेंद केला. यात त्याने राहुल द्रविडला (६२४) मागे टाकले. आफ्रिकेत सर्वाधिक ११६१ धावांसह सचिन अव्वल स्थानी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.