आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-श्रीलंका आज वनडे सामना:विराट काेहली वा रोहित शर्माच्या अनुपस्थितीत 1028 दिवसांनंतर आता भारतीय संघ खेळणार वनडे सामना

काेलंबाेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि यजमान श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये आज रविवारपासून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. काेलंबाेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आज पहिला वनडे सामना रंगणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात युवांचा समावेश असलेला भारतीय संघ आता मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. विराट काेहली सध्या आपल्या टीमसाेबत इंग्लंड दाैऱ्यावर आहे. त्यामुळे काेहली आणि राेहितच्या अनुपस्थितीमध्ये शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा संघ सध्या श्रीलंका दाैऱ्यावर आहे. या दाेघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ १०२८ दिवसांनंतर मर्यादित षटकांचा सामना खेळणार आहे. हे दाेघे सहभागी नसताना भारताने आपला शेवटचा वनडे सामना २०१८ मध्ये अफगाणिस्तान टीमविरुद्ध खेळला हाेता. भारताच्या विजयाची मदार गाेलंदाज भुवनेश्वर कुमार, चहल व कुलदीपवर असेल. पृथ्वी शाॅ सध्या संघातील आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

प्रत्येकी १५ विजयांसह दाेन्ही संघ तुल्यबळ : भारत व श्रीलंका यांच्यात ३३ वनडे झाले. यात प्रत्येकी १५ विजयांसह दाेन्ही संघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच तीन वनडे सामने अनिर्णीत राहिले.

सूर्यकुमार-ईशानचे साेबत पदार्पण : टी-२० पाठाेपाठ आता सुर्यकुमार व इशान श्रीलंकेविरुद्ध सामन्यातून वनडेत साेबत पदार्पण करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...