आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Sri Lanka 1st ODI LIve Team India Can Go With 2 Allrounders, 2 Pacers And 2 Spinners, Rain Can Disturb The Match

लंका दाैरा:टी-20 पाठाेपाठ ईशानचे वनडे पदार्पणात अर्धशतक; भारताची श्रीलंकेवर 7 गड्यांनी मात

कोलंबोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-२० व वनडे पदार्पणात अर्धशतक साजरे करणारा ईशान किशन एकमेव भारतीय फलंदाज

कर्णधार शिखर धवन (नाबाद ८६) व युवा फलंदाज ईशान किशनच्या (५९) झंझावाती खेळीतून भारतीय क्रिकेट संघाने रविवारी सलामीच्या वनडेत श्रीलंकेला ७ गड्यांनी पराभूत केले. यासह धवनच्या नेतृत्वात भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना उद्या मंगळवारी याच मैदानावर रंगणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंके निर्धारित ५० षटकांत ९ बाद २६२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३६.४ षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री सहज खेचून आणली. विजयात पृथ्वी शाॅ (४३), मनीष (२६) यांचेही माेलाचे याेगदान ठरले. सामनावीर पृथ्वी शाॅने कर्णधार शिखर धवनसाेबत अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. मात्र, त्याला श्रीलंकेच्या उपकर्णधार डिसिल्वाने बाद केले.

ईशानचे विक्रमी अर्धशतक : इंग्लंडविरुद्ध टी-२० पाठाेपाठ आता श्रीलंकेविरुद्ध वनडेत पदार्पण करताना ईशानने अर्धशतक साजरे केले. त्याने ४२ चेंडूंत ५९ धावा काढल्या. टी-२० व वनडे पदार्पणात अर्धशतक साजरे करणारा ईशान हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. तसेच पदार्पणात सूर्यकुमारने नाबाद ३१ धावांची खेळी केली.

कर्णधार धवनचे नाबाद अर्धशतक
भारतीय क्रिकेट संघाने कुशल नेतृत्वासह शिखर धवनने झंझावाताची लय कायम ठेवली. त्याने कर्णधार आणि सलामीवीराच्या दुहेरी भूमिकेतून संघासाठी विजयी झंंझावाती खेळी केली. त्याने नाबाद ८६ धावा काढल्या. यासाठी त्याला सलामीच्या पृथ्वी शाॅ (४३) आणि ईशान किशनची (५९) माेलाची साथ मिळाली.

उद्या निर्णायक वनडे सामना
भारत व श्रीलंका यांच्यात मंगळवारी मालिकेतील दुसरा वनडे सामना रंगणार आहे. श्रीलंका टीमसाठी हा दुसरा वनडे ‘करा वा मरा’ असा आहे. सलामीच्या पराभवामुळे यजमान श्रीलंका घरच्या मैदानावर अडचणीत सापडली आहे. यजमान टीम मालिका पराभवाच्या नामुष्कीला सामाेरी जाण्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...