आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Sri Lanka 2nd ODI LIVE Score Update; India Tour Of Sri Lanka Live Update | Shikhar Dhawan Prithvi Shaw Ishan Kishan

दुसरा वनडे:सूर्यकुमार, दीपकची चमकदार खेळी; भारताचा राेमहर्षक मालिका विजय; श्रीलंकेचा सलग दुसरा पराभव

कोलंबोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपक चहर ठरला सामनावीर; भारतीय संघाची मालिकेत २-० ने विजयी आघाडी

भुवनेश्वर (३/५४) आणि युजवेंद्र चहलच्या (३/५०) शानदार गाेलंदाजीपाठाेपाठ युवा फलंदाज सूर्यकुमार (५३) व सामनावीर दीपक चहरच्या (नाबाद ६९) अर्धशतकी खेळीतून भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय साकारला. धवनच्या नेतृत्वात भारताने आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाची नवमी साजरी केली. भारताने दुसऱ्या वनडेत श्रीलंकेवर तीन गड्यांनी मात केली. यासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. आता शुक्रवारी तिसरा व शेवटचा सामना रंगणार आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २७५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने ४९.१ षटकात सात गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. धवनच्या नेतृत्वात भारताचा हा पहिला मालिका विजय नाेंद झाला आहे. चहरने पहिले वनडे अर्धशतक झळकावलेे.,

भुवनेश्वर, चहलचे प्रत्येकी तीन बळी : भारतीय संघाकडून गाेलंदाज भुवनेश्वर कुमार व युजवेंद्र चहलने दुसऱ्या वनडेत श्रीलंका टीमचे कंबरडे माेडले. या दाेघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. चहलने १० षटकांत ५० धावा देत तीन गडी बाद केले. यात एका निर्धाव षटकाचाही समावेश आहे. दीपक चहरने दाेन विकेट घेतल्या.

असलंका, फर्नांडाेचे अर्धशतक व्यर्थ : यजमान श्रीलंका टीमकडून सलामीवीर फर्नांडाे आणि असलंकाने शानदार अर्धशतकी खेळी केली. फर्नांडाेने ७१ चेंडूंत ५० धावा काढल्या. असलंकाने ६८ चेंडूंत ६५ धावा काढल्या.

आठव्या स्थानावरून दीपक चहरचे विजयी अर्धशतक; सुर्यकुमारही चमकला
भारतीय संघाच्या विजयात सुर्यकुमार यादव आणि दीपक चहर चमकले. आठव्या स्थानावरून फलंदाजी करताना दीपक चहरने नाबाद अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने पहिले वनडे अर्धशतक साजरे केले. त्याने ८२ चेंडूंत सात चाैकार व एका षटकारासह नाबाद ६९ धावा काढल्या. तसेच युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने करिअरमधील दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार खेळी केली. यातून त्याला पहिल्या वनडे अर्धशतकाची नाेंद करता आली. त्याने यजमान श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ४४ चेंडूंत ५३ धावा काढल्या. यात सहा चाैकारांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...