आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत-श्रीलंका दुसरा वनडे:श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

काेलंबाेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंकेविरुद्ध मालिका आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आज मंगळवारी दुसरा वनडे सामना हाेणार आहे. या विजयाने भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध सलग नववी वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवता येईल. दुसरीकडे आपल्या कुशल नेतृत्वात भारतीय संघाला मालिका विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार शिखर धवन सज्ज झाला आहे. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी करताना रविवारी सलामीच्या वनडेत भारताला शानदार विजय मिळवून दिला. याच विजयी सलामीने भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. श्रीलंका टीमसाठी ही निर्णायक लढत आहे.

काेहलीच्या टीमचा आजपासून सराव सामना : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ आता कसाेटी मालिकेच्या तयारीसाठी आज मंगळवारपासून सराव सामना खेळणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारत आणि काउंटी इलेव्हन संघ समाेरासमाेर असतील. पुढच्या महिन्यात ४ आॅगस्टपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेईल.

बातम्या आणखी आहेत...