आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • Cricket
 • India Vs Sri Lanka 3rd ODI Live India Has Chance To Clean Sweep Sri Lanka For The Fourth Time | Sanju Samson, Nitish Rana, Chetan Sakariya, K Gowtham, Rahul Chahar Making Debut; News And Live Updates

भारताने 2-1 ने जिंकली मालिका:श्रीलंकेने भारताला 3 गडी राखून केले पराभूत; 68 धावांत 7 गडी गमावणे भारतीय संघाला पडले महागात

कोलंबो3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अविष्का आणि राजपक्षाचे अर्धशतक, दोघांत 100+ धावांची भागीदारी

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकाने भारतीय संघाचा 3 गडी राखून पराभव केला आहे. 227 धावांचे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने 39 व्या षटकात 7 गडी गमावत राखले आहे. भारतीय संघाला 68 धावा करताना 7 गडी गमावणे चांगलेच महागात पडले आहे. यामुळे भारतीय संघाचा डाव 43.1 षटकांत 225 धावांवर ऑलआऊट झाला.
स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

पावसामुळे डीआरएस अंतर्गत भारतीय संघाच्या धावांमध्ये 1 ने वाढ करण्यात आली. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर त्याच वेळी भानुका राजपक्षेने 65 धावा केल्या.

राहुल चहरने घेतले 3 विकेट
फिरकीपटू राहुल चहरने 3 विकेट घेतले आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला मनीष पांडेजवळ झेलबाद केले. ते शून्यावर बाद झाले. चरिथ अस्लंकाने 28 चेंडूत 24 धावा करत बाद झाला. त्याला हार्दिक पाड्यांने एलबीडब्ल्यू केले. तिसर्‍या विकेटसाठी अस्लंका आणि अविष्काने 43 धावांची भागीदारी केली होती.

साकरियाची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच विकेट
भारतीय संघाचा गोलंदाज चेतन साकरियाने 2 षटकांत 2 गडी बाद केले आहे. पहिल्या 23 व्या षटकात साकरियाने भानुका राजपक्षाला कृष्णाप्पा गौतमकडे झेलबाद केले. तो 56 चेंडूत 65 धावांवर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील साकारियाची ही पहिली विकेट होती. यानंतर 25 व्या षटकात श्रीलंकेचा उपकर्णधार धनंजय डी सिल्वादेखील झेलबाद झाला. सिल्वा केवळ 2 धावा करत बाद झाला.

साकरियाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेतली आहे.
साकरियाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेतली आहे.

अविष्का आणि राजपक्षाचे अर्धशतक
श्रीलंकन खेळाडू अविष्काने एकदिवसीय सामन्यात सलग ही दुसरे अर्धशतक झळकावले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 50 धावा काढल्या होत्या. अविष्काची एकदिवसीय सामन्यातील हे 5 वे अर्धशतक आहे. दरम्यान, मिनोद भानुका 17 चेंडूत 7 धावा करून बाद झाला असून त्याला कृष्णप्पा गौतमने चेतन साकारियाच्या हाती झेलबाद केले. विशेष म्हणजे ही गौतमची आंतरराष्ट्रीय विकेट होती.

गौतमने घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट

 • श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. श्रीलकंन संघाची पहिली विकेट 35 धावांवर पडली. गौतमने मिनोद भानुकाला चेतन साकारियाच्या हातात झेलबाद केले. तो 7 धावा करत बाद झाला. गौतमची ही आंतरराष्ट्रीय पहिलीच विकेट होती.
 • यानंतर राजपक्षे आणि अविष्काने संघाची कमान आपल्या हातात घेतली. दरम्यान, अविष्काने या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. दुसर्‍या वनडे सामन्यात त्याने 50 धावा केल्या. अविष्काच्या एकदिवसीय सामन्यात एकूण पाचवे अर्धशतक आहे.
 • राजपक्षे आणि अविष्का यांच्यात दुसर्‍या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी झाली. राजपक्षेने वनडेमधील पहिले अर्धशतक झळकावले.
 • पहिल्या 23 व्या षटकात साकरियाने भानुका राजपक्षाला कृष्णाप्पा गौतमकडे झेलबाद केले. तो 56 चेंडूत 65 धावांवर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील साकारियाची ही पहिली विकेट होती.
 • यानंतर 25 व्या षटकात श्रीलंकेचा उपकर्णधार धनंजय डी सिल्वादेखील झेलबाद झाला. सिल्वा केवळ 2 धावा करत बाद झाला.

भारतीय संघाने 68 धावा बनवताना 7 गडी गमावले
भारतीय संघ 43.1 षटकांत 225 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाने 68 धावा बनवताना 7 गडी गमावले. यात मनीष पांडे, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, राहुल चहर आणि नवदीप सैनी यांच्या विकेटचा समावेश आहे. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय संघाचे 6 गडी बाद केले. प्रवीण जयविक्रम आणि अकिला धनंजय यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दुशमंत चामिराला 2 आणि चमिका करुणरत्ने व दासुन शनाका यांना 1-1 गडी बाद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...