आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांच्या विक्रमी फरकाने पराभव केला. या सामन्यात शुभमन गिलने नाबाद 126 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने एका हाताने 81 मीटर लांब षटकार मारला. सूर्यकुमार यादव फलंदाजीत विशेष काही करू शकला नसला तरी क्षेत्ररक्षणात त्याने चांगली कामगिरी केली. बीसीसीआयने अंडर-19 महिला विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाला सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी महिला संघाचा सत्कार समारंभही झाला. पाहा, सामन्यातील काही टॉप मोमेंट्स...
1. सचिनने अंडर-19 महिला संघाचा गौरव केला
सामना सुरू होण्यापूर्वी भारतरत्न सचिन तेंडुलकरने अंडर-19 महिला क्रिकेट संघाचा सत्कार केला. या संघाने 29 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत पहिला अंडर-19 महिला विश्वचषक जिंकला होता. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना संबोधित करताना सचिन म्हणाला की, तुम्ही सर्वांनी संपूर्ण देशाला गौरवान्वित केले आहे.
हा विजय वर्षानुवर्षे स्मरणात राहील, असे सचिन म्हणाला. या सन्मानासोबतच बीसीसीआयने 19 वर्षांखालील संघाला 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले.
2. ब्रेसवेलचा डायव्हिंग कॅच
न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने पहिल्या डावात शानदार डायव्हिंग झेल घेतला. 13व्या षटकात ब्लेअर टिकनरच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने लेग साईडवर चेक शॉट खेळला. चेंडू मिड-ऑनच्या दिशेने हवेत वर गेला, जिथे मायकेल ब्रेसवेलने उजवीकडे डायव्ह करून एक शानदार झेल घेतला. सूर्यकमार यादव 13 चेंडूत 24 धावा करून बाद झाला.
19व्या षटकात ब्रेसवेलने पुन्हा एकदा डायव्हिंगचा जबरदस्त प्रयत्न केला. बेन लिस्टरने षटकातील तिसरा चेंडू भारताच्या शुभमन गिलकडे लो-फुल टॉस टाकला. गिलने लाँग-ऑनच्या दिशेने हवेत खेळाला, जिथे ब्रेसवेलने हवेत डायव्ह करत एका हाताने झेल घेतला. पण, डायव्हिंग करताना चेंडू हातातून सुटला आणि ब्रेसवेलच्या प्रयत्नामुळे गिलला एकच धाव मिळाली.
3. गिलने एका हाताने षटकार मारला
भारताच्या शुभमन गिलने 17व्या षटकात एका हाताने षटकार ठोकला. ब्लेअर टिकनरने ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लांबीचा स्लोअर चेंडू टाकला. गिलला याची जाणीव झाली आणि त्याने मिडऑफवर षटकार ठोकला. या चेंडूवर गिलचा तोल गेला आणि त्याचा एक हात बॅटवरून सुटला. पण, दुसऱ्या हाताच्या नियंत्रणाने चेंडू सीमारेषेबाहेर गेला. गिल त्यावेळी 80 धावांवर फलंदाजी करत होता. त्याने नाबाद 126 धावा केल्या.
4. सूर्याने 2 फ्लाइंग कॅच घेतल्या
दुसऱ्या डावात पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिन अॅलन बाद झाला. हार्दिक पांड्याने ऑफ साइडवर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकला. अॅलन तो कट करायला गेला, पण चेंडू बॅटच्या बाहेरील कड घेऊन स्लिपमध्ये गेला. जिथे स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने हवेत झेप घेत शानदार झेल घेतला. अॅलनला 4 चेंडूत केवळ 3 धावा करता आल्या.
तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादवने ग्लेन फिलिप्सचा असाच झेल टिपला. हार्दिक पांड्याने ऑफ स्टंपवर फिलिप्सला शॉर्ट ऑफ लेन्थ बॉल टाकला. चेंडू बॅटच्या बाहेरील कड घेऊन स्लिपमध्ये सूर्यकुमारकडे गेला. जिथे सूर्याने पुन्हा हवेत उडी मारून झेल घेतला. फिलिप्स 2 धावा करून बाद झाला.
5. शुभमनचे ट्रेडमार्क सेलिब्रेशन
भारताच्या शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 63 चेंडूत 126 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत 7 षटकार आणि 12 चौकारही मारले गेले. शतकानंतर त्याने हेल्मेट काढून हवेत उडी मारून आनंद साजरा केला.
यानंतर त्याने कंबरेमागे बॅटचा हात ठेवून प्रेक्षकांसमोर नतमस्तक होऊन आपल्या ट्रेडमार्क शैलीत शतक साजरे केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.