आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवन (97), शुभमन गिल (64) आणि श्रेयस अय्यर (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 गडी गमावून 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघाला 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून काइल मेयर्सने सर्वाधिक 75 धावा केल्या. ब्रँडन किंगने 54 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
शेवटचा थरार
वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावा करायच्या होत्या, मात्र त्यांना केवळ 11 धावाच करता आल्या. रोमारियो शेफर्ड (39) आणि अकील हुसेन (33) यांनी नाबाद भागीदारी करत विंडीजला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र मोहम्मद सिराजने ते होऊ दिले नाही. ९७ धावांची खेळी करणारा टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
धवन आणि गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी
टीम इंडियाचे सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 105 चेंडूत 119 धावांची भागीदारी केली. कर्णधार धवनने 53 चेंडूत 50 आणि शुभमन गिलने 52 चेंडूत 64 धावांचे योगदान दिले.श्रेयस अय्यरनेही चांगली फलंदाजी केली आणि 54 धावा केल्यानंतर तो बाद झाला. श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या.
भारत 16 वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य
वेस्ट इंडिजने 2006 मध्ये भारताचा एकदिवसीय मालिकेत पराभव केला होता. त्यानंतर भारताने 4 वेळा वेस्ट इंडिजचा दौरा केला. या सर्वच दौऱ्यांत भारताने विंडिजला धूळ चारली. दोन्ही संघांनी एकमेकाविरोधात एकूण 9 एकदिवसीय मालिका खेळल्या. त्यातील 5 सामन्यांत ब्ल्यू आर्मीचा विजय झाला.
टीम इंडिया कोहली, रोहित, पंत, बुमराह व हार्दिकशिवाय मैदानात
वेस्ट इंडिज विरोधातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत व जसप्रित बुमराह या आपल्या हुकमी पत्त्यांशिवाय मैदानावर उतरेल. शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. पहिल्या सामन्यात शिखर धवन व शुभमन गिल डावाची सुरूवात करतील असा अंदाज आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर 4 क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर दीपक हुड्डा व सहाव्या क्रमांकावर संजू सॅमसन खेळू शकतो.
भारताची प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (डब्ल्यूके), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रणंद कृष्णा.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: शाई होप (विकेटकीपर), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन (क), रोवमन पॉवेल, अकील हुसेन, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सिल्स.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.