आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी पराभूत केले. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. हा भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजवर १०० वा विजय ठरला. भारताने विंडीजला टी-२० मध्ये ११ व्या वेळी हरवले. दोन्ही संघांत आतापर्यंत १८ सामने झाले आहेत.
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर विंडीजने प्रथम खेळताना ७ बाद १५७ धावा उभारल्या. निकोलस पूरनने ६१ व काइलने ३१ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईसह हर्षल पटेलने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांत ४ गडी गमावत विजय साकारला. कर्णधार रोहित शर्माने ४०, ईशान किशनने ३५, सूर्यकुमारने नाबाद ३४ व व्यंकटेश अय्यरने नाबाद २४ धावा केल्या. सूर्यकुमार व व्यंकटेशने पाचव्या गड्यासाठी नाबाद ४८ धावांची भागीदारी केली.
धावफलक, नाणेफेक भारताने जिंकली (फलंदाजी)
अवांतर : ४, एकूण : १८.५ षटकांत ४ बाद १६२ धावा. गोलंदाजी : शेल्डन कार्टेल ४-०-३५-१, रोमारियो शेफर्ड ३-०-२४-०, ओडियन स्मिथ २-०-३१-०, अकेल हुसैन ४-०-३४-०, रोस्टन चेस ४-०-१४-२,फॅबियन अॅलेन १.५-०-२३-१.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.