आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत Vsवेस्‍ट इंडिज T20:तिसऱ्या T20 सामन्‍यामध्‍ये भारताचा 7 गडी राखून विजय, सूर्यकुमारने 44 चेंडूत केल्या 76 धावा

सेंट किट्स13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 7 गडी राखून विजय दणदणीत मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 गड्यांच्‍या मोबदल्‍यात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात भार भारताने 19 षटकांत तीन गड्यांच्‍या मोबदल्‍यात विजय संपादीत केला आहे.

भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्‍याखालोखाल ऋषभ पंतने 26 चेंडूत 33 धावांची धडाकेबाज खेळी केली. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने 15 वेळा जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या संघाने 21 टी-20 सामन्यांमध्ये 15 सामने जिंकले आहेत.

कर्णधार रोहित शर्मा 5 चेंडूत 11 धावा करून निवृत्त झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यर 27 चेंडूत 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले.

रोव्हमन पॉवेल अफलातून फटका खेळताना
रोव्हमन पॉवेल अफलातून फटका खेळताना

वेस्‍ट इंडिजच्‍या फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकात 56 धावा केल्या. सर्वाधिक 73 धावा काइल मेयर्सने केल्या. त्याचवेळी रोव्हमन पॉवेलने 23 धावांची खेळी साकारली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 2 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने 1-1 विकेट घेतली.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल
आजच्‍या सामन्‍यात रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी दीपक हुड्डाला संधी देण्‍यात आली.

सहका-यांसमवेत चर्चा करताना रोहित शर्मा
सहका-यांसमवेत चर्चा करताना रोहित शर्मा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडीज: काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, निकोलस पूरन (कॅंड आणि विकेट), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हॉन थॉमस, जेसन होल्डर, अकिल होसेन, डॉमिनिक ड्रेक, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

सेंट किट्समधील बेसेट्रे ग्राउंड स्टेडियमचा कौल
आतापर्यंत या मैदानावर 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सात संघ प्रथम गोलंदाजी करून जिंकले आहेत. केवळ दोन सामन्‍यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. पहिल्या डावात येथील सरासरी धावसंख्या 128 आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या इंग्लंडची (182/6) आहे. वेस्ट इंडिजची येथे सर्वात कमी धावसंख्या 45 धावा आहे.

बातम्या आणखी आहेत...