आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संघाचा विकेटकीपर पार्थिव पटेलने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून (कसोटी, वनडे, टी-20) संन्यास घेतला आहे. त्याची क्रिकेटमध्ये 19 वर्षांचे करिअर होते. पार्थिवने 2002 मध्ये 17 वर्षे 153 दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यासह, तो यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
पार्थिव हा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू होता. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, पीयूष चावला आणि एल शिवरामकृष्णन यांच्या नावावर आहे.
पार्थिवने मानले गांगुलीचे आभार
पार्थिवने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे आभार मानले. पार्थिवने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "मी विशेषतः दादाचे आभार मानतो. ते माझे पहिले कर्णधार आहेत. त्यांनी माझ्यावर बराच विश्वास दाखवला."
— parthiv patel (@parthiv9) December 9, 2020
दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने पत्नी अवनी आणि आई-वडिलांचे आभार मानले. त्याने लिहिले की, "माझ्या या प्रवासात तुम्ही मला साथ दिलीत, त्यासाठी धन्यवाद."
U have been integral part of the journey...thank you for always been there...❤️❤️❤️love you... https://t.co/Qkf1Wbms2B
— parthiv patel (@parthiv9) December 9, 2020
8 वर्षांपूर्वी खेळला शेवटचा वनडे सामना
पार्थिवने आपला अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध जोन्हासबर्ग येथे खेळला होता. त्याने अखेरचा वनडे सामना 12 फेब्रुवारी 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेन येथे खेळला होता.
पार्थिवला तिन्ही स्वरूपात शतक करता आले नाही
पार्थिवने जानेवारी 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 25 सामने खेळले आहेत. यात त्याने 934 धावा केल्या. तर वनडे करिअरमध्ये त्याने 38 सामने खेळले असून 736 धावा केल्या आहेत. पार्थिव पटेल केवळ 2 टी-20 सामने खेळले आहेत. पार्थिव पटले तिन्ही प्रकारात एकही शतक झळकावता आले आहे.
फर्स्ट क्लासमध्ये 10 हजारपेक्षा जास्त धावा
पार्थिवने 194 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. ज्यात 43.39 च्या सरासरीने 11,204 धावा केल्या आहेत. त्याने फर्स्ट क्लास मॅचमध्ये 27 शतके आणि 62 अर्धशतके केली आहेत. तर लिस्ट A मध्ये त्याने 193 सामने खेळले आहेत. यामध्ये 29.72च्या सरासरीने 5172 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.