आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशिया चषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेतील गतविजेत्या भारताचे हे दुसरे कांस्यपदक आहे. संघ ४० वर्षांच्या इतिहासात ११ व्या वेळी स्पर्धेत उतरला असून दहाव्या वेळी पदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारा भारत एकमेव संघ आहे. २००९ मध्ये केवळ एकदाच संघाचे पदक हुकले होते.
भारताने ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण १० पदके जिंकली आहेत. लीगमध्ये दक्षिण कोरिया सर्वात यशस्वी संघ असून त्याची ४ सुवर्णांसह ९ पदके आहेत. पाकिस्तान ९ पदकांसह संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताच्या राजकुमार पालने सातव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. चौथ्या क्वार्टरपर्यंत गोलफरक सारखाच राहिला. पूर्णवेळपर्यंत जपानला एकही गोल करता आला नाही. साखळी सामन्यात जपानने भारताचा ५-२ असा पराभव केला होता, तर सुपर-४ मध्ये भारताने जपानला २-१ ने हरवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.