आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2023 मध्ये भारतीय क्रिकेटसाठी सर्वात मोठी संधी ती म्हणजे वनडे विश्वचषक असेल. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच वनडे विश्वचषक फक्त भारतातच होणार आहे. बहुधा रोहित आणि कोहलीचा हा शेवटचा विश्वचषक असेल.
बुमराह, भुवनेश्वर, राहुल सारख्या खेळाडूंनाही त्यांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच विश्वचषक ट्रॉफीला स्वाताच्या हातात घ्यायला आवडेल. या विश्वचषकाकडून खूप अपेक्षा आहेत कारण भारताने गेल्या वेळी धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय भूमीवर विश्वचषक जिंकला होता.
गेल्या दशकात घरच्या मैदानावर आमचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे, ज्यामुळे संघाचे मनोबल नक्कीच उंचावेल.
मात्र, आव्हानांची कमी नाहीेये. कारण विश्वचषक विजेत्या संघाला तयार करण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. गेल्या काही स्पर्धांमध्ये आपण या आघाडीवर अपयशी ठरलो आहोत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेले प्रयोग.
अजूनही डझनभर सक्षम खेळाडू संघात सामील होण्यासाठी रांगेत आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि पाकिस्तानचे बलाढ्य संघही भारतासाठी अनुकूल खेळपट्ट्यांवर मोठे आव्हान उभे करू शकतात.
या स्पर्धेत पाकिस्तानचा सहभाग संशयाच्या भोवऱ्यात असून, त्यांची भारतात येण्याची इच्छा आणि केंद्र सरकारच्या निर्णयावर ते अवलंबून असेल. भारतात 2011 च्या विश्वचषकानंतर क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. नवीन नियम, नवीन संघ आणि नवीन अपेक्षा असतील.
10 वर्षात घरच्या मैदानावर जिंकले 74 पैकी 47 सामने
घरच्या मैदानावर खेळण्याचा सर्वात मोठा फायदा भारताला मिळेल. गेल्या दशकात भारताने जितके सामने जिंकले आहेत तितके इतर कोणत्याही संघाने खेळले नाहीत. दिवस-रात्रीच्या सामन्यांमध्येही दवबिंदूची भूमिका वाढते आणि भारताला अशा परिस्थितीत खेळण्याचा आणि जिंकण्याचा अधिक अनुभव आहे. भारताने घरच्या मैदानावर 74 पैकी 47 सामने जिंकले आहेत आणि 10 वर्षांत केवळ 25 सामने गमावले आहेत.
श्रीलंका मालिकेत विश्वचषक संघाची झलक
वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेने करेल. त्याच्या संघात भारताच्या विश्वचषकाचे संकेत आहेत. पंत तंदुरुस्त नसल्यास सॅमसन जागा बनवू शकतो. गेल्या काही वर्षांत भारताची फलंदाजी चांगली सुरू आहे. मात्र, खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत चिंता निर्माण होऊ शकते. खेळाडूंना मॅच सराव देण्याचेही व्यवस्थापनासमोर आव्हान असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.