आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वर्ष, नवी आशा:आयसीसीच्या दोन ट्रॉफी जिंकण्याची या हंगामात भारतीय संघांना संधी! ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
दाैऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने नवीन वर्षाचे स्वागत दक्षिण आफ्रिकेत केले. यादरम्यानच्या जल्लाेषाचा फाेटाे व्हायरल झाला. - Divya Marathi
दाैऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने नवीन वर्षाचे स्वागत दक्षिण आफ्रिकेत केले. यादरम्यानच्या जल्लाेषाचा फाेटाे व्हायरल झाला.

भारतीय क्रिकेट संघांना आता यंदाच्या नव्या वर्षात आयसीसीच्या दाेन महत्त्वाच्या ट्राॅफीवर सुवर्णाक्षरांनी आपले नाव काेेरण्याची माेठी संधी आहे. कारण, २०२२ मध्ये आयसीसीच्या दाेन महत्त्वाच्या स्पर्धा हाेणार आहेत. यामध्ये पुरुष आणि महिलांच्या विश्वचषक स्पर्धांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला अव्वल कामगिरी साधत आयसीसीच्या या दाेन्ही जागतिक दर्जाच्या स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. ४ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयाेजन हाेणार आहे. वनडे फाॅरमॅटमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. त्यानंतर १६ आॅक्टाेबर ते १३ नाेव्हेंबरदरम्यान पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा हाेणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात हाेईल. भारताच्या दाेन्ही संघांना या स्पर्धेच्या किताबासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शन व कर्णधाराच्या नेतृत्वात हे यश संपादन करण्यासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ उत्सुक आहे.

मालिकेत स्टार; मल्टिनॅशनल इव्हंेंटमध्ये फ्लाॅप
सर्व फाॅरमॅटच्या द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघ सुपरस्टार ठरताे. ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका विजय, इंग्लंडविरुद्ध गत वर्षी वनडेतील मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडवरील मालिका विजयातून टीम इंडियाने आपली क्षमता सिद्ध केली. मात्र, टीमचे खेळाडू मल्टिनॅशनलच्या इव्हेंटमध्ये आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरतात.

आघाडीच्या फळीवर सर्वाधिक दडपण
आघाडीच्या फळीची सुमार कामगिरी ही टीम इंडियाच्या २०१७ चॅम्पियन्स ट्राॅफी व २०१९ मधील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील अपयशाचे माेठे कारण ठरले. तसेच २०२१ मध्ये विश्वचषकामध्ये पाकविरुद्ध सामन्यात भारताची आघाडीची फळी अपयशी ठरली हाेती. त्यामुळे आता या फळीला कामगिरीचा दर्जा उंचावावा लागेल.

उसळत्या पिचवर आता टीम इंडियाचा दबदबा
उसळत्या पिचवर भारतीय संघाच्या फलंदाजांना खेळणे जिकिरीचे ठरत हाेते. मात्र, आता याच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाचे फलंदाज सुपरस्टार ठरत आहेत. त्यामुळे आता याच पिचवर खेळण्याचे काैशल्य टीममधील खेळाडूंत आले आहे. यातून याचा टीमला माेठा फायदा हाेत आहे. त्यामुळे संघ विजयी ठरत आहे.

नवा गडी, नवे राज : नवीन काेच व कॅप्टनमुळे संघात नवीन विचारांची फळी : अयाज मेमन, क्रीडा विश्लेषक
नवीन कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी हाेऊ शकेल. राेहितच्या नावे आपल्या नेतृत्वात टीमला आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियनचा बहुमान मिळवून देण्याची विक्रमी कामगिरी नाेंद आहे. त्यामुळे माेठा अनुभव पाठीशी असलेला कर्णधार राेहित शर्मा आणि नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे मार्गदर्शन टीम इंडियासाठी पाठबळ देणारे ठरेल. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१८ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हाेते. त्यामुळे “नवा गडी नवे राज’प्रमाणेच संघामध्ये नवीन विचार असलेली फळीही आहे. या विश्वचषकाच्या तयारीसाठी टीम इंडिया १५ पेक्षा अधिक टी-२० सामने खेळणार आहे. याचदरम्यान आशिया कप आहे. संघामधील युवा ख‌ेळाडू सूर्यकुमार यादव व ऋषभ टी-२० विश्वचषकादरम्यान टीमसाठी हुकमी एक्के ठरतील.

बातम्या आणखी आहेत...