आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Indian Fan Fined 6.50 Lakhs For Entering Into Stadium During India Vs Zimbabwe Match, T 20 World Cup Updates, Rohit Sharma, Cricket Match

हातात तिरंगा घेऊन मैदानात घुसला भारतीय चाहता:रोहित शर्माजवळ पोहोचून रडू लागला, MCGने ठोठावला 6.50 लाखांचा दंड

अ‍ॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यादरम्यान एका भारतीय चाहत्याला मैदानात बळजबरी घुसणे महागात पडले आहे. त्याला आता 6.50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वास्तविक ही घटना 17व्या षटकातील आहे. हार्दिक पांड्या जेव्हा 5वा चेंडू टाकत होता, तेव्हा हा मुलगा मैदानात घुसला आणि थेट रोहित शर्मापर्यंत पोहोचला. तो रडताना दिसला.

मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून ओढत नेण्यास सुरुवात केली. मग रोहितने त्यांना आरामात बाहेर नेण्यास सांगितले. या घटनेमुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता. या चाहत्याचे नाव काय आहे, याबाबत अजून फारशी माहिती मिळू शकलेली नाही. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

4 फोटोंमध्ये पाहा संपूर्ण घटना

17व्या षटकात तरुण फॅन मैदानात घुसला.
17व्या षटकात तरुण फॅन मैदानात घुसला.
सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडायला धावाधाव सुरू केली. काही वेळ हा चाहता मैदानावर धावलाही.
सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडायला धावाधाव सुरू केली. काही वेळ हा चाहता मैदानावर धावलाही.
कॅप्टन रोहित शर्माने सुरक्षा कर्मचाऱ्यांना चाहत्याला सावकाश बाहेर काढण्यास सांगितले.
कॅप्टन रोहित शर्माने सुरक्षा कर्मचाऱ्यांना चाहत्याला सावकाश बाहेर काढण्यास सांगितले.
हिटमॅनशी बोलताना तरुण चाहता रडू लागला. यादरम्यान सामना थांबवण्यात आला.
हिटमॅनशी बोलताना तरुण चाहता रडू लागला. यादरम्यान सामना थांबवण्यात आला.

चाहत्याला दंड लावण्याचे दुर्मिळ प्रकरण

यापूर्वीही चाहत्यांना जबरदस्तीने मैदानात घुसताना तुम्ही पाहिले असेलच. सहसा अशा घटनांमध्ये सुरक्षा रक्षक त्या चाहत्याला पकडून मैदानाबाहेर काढतात. पण चाहत्याला दंड ठोठावण्याची ही दुर्मिळ घटना आहे. तथापि, ऑस्ट्रेलियामध्ये हे सामान्य आहे. परंतु, MCG व्यवस्थापनाने प्रथमच ही बाब सार्वजनिक केली आहे.

दंडाची रक्कम MCGच्या मोठ्या स्कोअर बोर्डवर दर्शविली

दंडाची रक्कम मेलबर्न क्रिकेट स्टेडियमच्या मोठ्या स्कोअर बोर्डवरही प्रदर्शित करण्यात आली होती. मैदानाच्या सुरक्षेत अडथळा आणल्याप्रकरणी एका तरुण चाहत्याला दंड ठोठावण्यात आला आहे. यावर सोशल मीडियाच्या चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काही सोशल फॅन्सनी लिहिले- 'तरुण एवढा मोठा दंड कसा भरणार?'

भारतीय चाहत्यांनी दाखवला प्रचंड उत्साह, पाहा 5 फोटोज

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर तिरंगा फडकला.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर तिरंगा फडकला.
टीम इंडियाच्या विजयावर चाहत्यांनी जल्लोष केला.
टीम इंडियाच्या विजयावर चाहत्यांनी जल्लोष केला.
भारतीय संघाने हा सामना 71 धावांनी जिंकला.
भारतीय संघाने हा सामना 71 धावांनी जिंकला.
भारतीय चाहते तिरंगा, बॅनर आणि पोस्टर घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसले.
भारतीय चाहते तिरंगा, बॅनर आणि पोस्टर घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसले.

मैदानाला मिळतात मायनस पॉइंट्स, बॅनही करतात

आयसीसी अशा घटनांवर नजर ठेवते. BCCI पॅनेल पंच राजीव रिसोडकर यांनी स्पष्ट केले की, सुरक्षा तोडल्यास यजमान मैदानाला मायनस पॉइंट्स दिले जातात. सलग तीन घटनांनंतर त्या मैदानावर बंदी घालण्यात येते. आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान अशा घटना घडू नयेत, असे त्यांचे मत आहे. कारण अशा घटनांमुळे संपूर्ण स्पर्धेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. इंदूरच्या घटनेची आठवण करून देताना ते म्हणतात की, आम्हाला (एमपीसीए) बीसीसीआयलाही उत्तर द्यावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...