आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरज चोप्राबाबत मोठी बातमी:टोकियोमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या भारताच्या भालाफेकपटूला 103 डिग्री ताप, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा गेल्या दोन दिवसांपासून तापाने त्रस्त आहे. त्याला जवळपास 103 डिग्री ताप आला आहे. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
नीरजला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. टोकियोहून परतल्यानंतर, तो सतत कोणत्या ना कोणत्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहतोय. याच थकव्यामुळे त्याला ताप आला असण्याची शक्यता आहे.

तरीही नीरज जाऊ शकतो राष्ट्रपती भवनात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील सर्व खेळाडूंना 14 ऑगस्टच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आहे. नीरजचा ताप कमी झाल्यास तो कार्यक्रमाला उपस्थित राहील. 15 ऑगस्टला भारतीय खेळाडूंना लाल किल्ला आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानालाही भेट द्यायची आहे.

बातम्या आणखी आहेत...